21 November 2019

News Flash

दिशा करणार का टायगरसोबत वाढदिवस साजरा?

दिशा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नसून ती रात्री तिच्या जवळच्या माणसांसोबत जेवायला जाणार आहे.

बॉलिवूडमधील कलाकार त्यांचे वाढदिवस खूप जल्लोषात साजरे करतात. त्यांच्या चाहत्यांनाही हे सेलिब्रेशन नक्की कसं होणार आहे हे जाणून घ्यायची इच्छा असते. बॉलीवूडमधली तरुण, देखणी अभिनेत्री दिशा पटाणीचा १३ जूनला वाढदिवस आहे. तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे की, ती वाढदिवस नक्की कसा साजरा करणार आहे. नुकतच तिने तिच्या बर्थ डे प्लॅन्सबद्दल सांगितलं.

दिशा वाढदिवस साजरा करणार असली तरीही ती उद्या ‘मलंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिशा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नसून ती रात्री तिच्या जवळच्या माणसांसोबत जेवायला जाणार आहे. दिशा म्हणाली की, “मला आठवत नाहीये की शेवटची मी कधी बर्थ डे पार्टी केली असेल.” “टायगर श्रॉफ या डिनरला येणार आहे की नाही?” हे दिशाला विचारले असता ती म्हणाले की, “अजून माझे काहीच प्लॅन्स नाहीयेत.”

दिशा म्हणाली की, “मी सध्या ‘मलंग’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे मी फार जागू शकत नाही. माझे खरंच काही प्लॅन्स नाहीयेत. मी कदाचित माझ्या मित्रांसोबत जेवायला जाईन. ‘भारत’च्या यशामुळे माझा वाढदिवस गोड झालाच आहे. मी या दिवशी व्यायामातून सुट्टी घेते आणि सगळ्या गोष्टी खाते. माझ्यासाठी लोकांनी आणलेले सगळे केक मी खाते.”

‘भारत’नंतर दिशा आता मोहित सुरीच्या ‘मलंग’मध्ये झळकणार आहे.

First Published on June 12, 2019 5:44 pm

Web Title: disha patani birthday celevbration plans djj 97
Just Now!
X