News Flash

दिशाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय चांगलाच व्हायरल!

दिशा आणि टायगरची केमिस्टी असलेल्या 'बागी २' ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.

दिशा पटानी

‘बागी २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. दिशा आणि टायगरची केमिस्टी असलेल्या ‘बागी २’ ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हापासून दिशाच्या फॅनफॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. दिशा सोशल मिडीयावर सक्रीय असून ती कायम तिचे फोटो शेअर करताना दिसत असते. सध्या दिशाने असाच एक व्हिडिओ शेअर केला असून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

टायगर श्रॉफ दिशाचा बेस्टफ्रेंड असून मध्यंतरी ते सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेले होते. यावेळी दिशाने शेअर केलेले पिकनिकचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता तिने  विदेशी गाण्यावरील एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याप्रमाणे दिशा-टायगरचे मालदीव फोटो व्हायरल झाले होते. त्याप्रमाणेच तिने नुकताच शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमधील तिचा डान्स पाहता ती एखाद्या नागिनीसारखी सळसळताना दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी दिशाने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी ती तिच्या झुंबा नृत्यप्रशिक्षिकेबरोबर एका विदेशी गाण्यावर थिरकताना दिसून आली. दिशा ज्या पद्धतीने नृत्य सादर करत होती ते पाहून ती एखाद्या सळसळणा-या नागिनीप्रमाणे भासत होती. त्यामुळे तिचा हा नागीन डान्स तिच्या चाहत्यांनी शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिशा हॉट अंदाजात दिसून येत आहे.

दिशाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत असून तिच्या चित्रपटांच्या यादीतही वाढ होत आहे. दिशा लवकरच सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटामध्ये झळकून येणार आहे. या चित्रपटामध्ये दिशाबरोबर क्वांटिको गर्ल प्रियांका चोपडा स्क्रिन शेअर करणार आहे. तसेच हा चित्रपट अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात येणार आहे. अली अब्बास जफर यांनी यापूर्वी ‘एक था टायगर’ आणि ‘सुल्तान’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 7:06 pm

Web Title: disha patani dance performance goes viral
Next Stories
1 सलमानच्या हत्येची सुपारी घेणाऱ्याला अटक, सलमानच्या सुरक्षेत वाढ
2 ..म्हणून दिव्यांकाच्या बचावासाठी विवेक आला धावून!
3 सारा खानचा न्यूड व्हिडिओ चुकून सोशल मीडियावर पोस्ट
Just Now!
X