News Flash

का आली दिशावर ट्रोल होण्याची वेळ?

एम एस धोनीनंतर दिशाच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून नुकतंच तिचा 'बागी २' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

दिशा पटानी

बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी अनेक कलाकार चंदेरी दुनियेकडे वाटचाल करत असतात. या कारणासाठीच ‘लोफर’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारी अभिनेत्री दिना पटानी हिने २०१६ साली ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. एम एस धोनीनंतर दिशाच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून नुकतंच तिचा ‘बागी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली दिशा काही कारणास्तव नेटक-यांच्या टीकेला बळी पडल्याचे दिसून येत आहे.

‘बागी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा गल्ला जमावल्यानंतर नुकताच दिशाने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा रिमिक्स गाण्यावर लॉकिंग प्रकारचा डान्स करत आहे. मात्र याच व्हिडिओमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.
दिशाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपल्या कोरिओग्राफरसह डान्स करताना दिसत आहे. मात्र डान्स करताना दिशाने घातलेल्या ड्रेसमुळे ती ट्रोल झाली आहे. एका ट्रोलरने दिशाला डान्स करताना व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. तर एका चाहत्याने तिची तुलना स्पायडरमॅनशी केली आहे. विशेष म्हणजे दिशा यावेळी ट्रोल होऊनही तिचा हा व्हिडिओ १३ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे.

दरम्यान, ‘एम एस धोनी’ या चित्रपटानंतर दिशाने २०१७ मध्ये ‘कुंग फू योगा’ या हॉलिवूड चित्रपटात काम केले. तसेच ‘बागी २’ नंतर ती तमिळ चित्रपट दिग्दर्शक सुंदर सी यांच्या ‘संघमित्रा’ या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 6:03 pm

Web Title: disha patani dance video viral troll
Next Stories
1 ‘छोटी मालकीण’मध्ये वर्षा दांदळेची धमाकेदार एण्ट्री
2 आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार
3 जिन्नाच्या फोटोला विरोध करणाऱ्यांनी गोडसेच्या मंदिरालाही विरोध करावा – जावेद अख्तर
Just Now!
X