25 November 2020

News Flash

दिशाने धनुष्यबाण दाखवत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा; फोटो होतोय व्हायरल…

दिशाने दिल्या अनोख्या शुभेच्छा

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कलाकारांपासून राजकीय नेत्यांपर्यंत विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी आपल्या अनोख्या शैलीत देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांमध्ये अभिनेत्री दिशा पटानीने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. दिशाने भगव्या रंगाच धनुष्यबाण दाखवत चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 5:05 pm

Web Title: disha patani dussehra greeting mppg 94
Next Stories
1 “माफी माग अन्यथा मानहानिचा दावा ठोकेन”; लविनाच्या आरोपांना अमायराचं प्रत्युत्तर
2 “हिंमत असेल तर समोर येऊन शिव्या घाल”; गौहर खानचं पवित्राला आव्हान
3 “सेटवर कंगना…”, हंसल मेहता यांनी सांगितला कंगनासोबत काम करण्याचा अनुभव
Just Now!
X