21 September 2020

News Flash

दिशा पटानीच्या वडिलांना करोनाची लागण

जगदीश पटानींसोबत अन्य दोन अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण

गेल्या अडीच- तीन महिन्यांपासून देशावर करोनाचं सावट आहे. आतापर्यंत सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. त्यातच आता अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांनादेखील करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी यांना करोनाची लागण झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश वीज वितरण कार्यालयातील अतिरिक्त सीएमओ अशोक कुमार यांनी ही माहिती दिली. त्यांच्यासोबत अन्य दोन कर्मचाऱ्यांचीही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

 

View this post on Instagram

 

Love you dad pic credit @luvudisha

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

जगदीश पटानी हे राज्य वीजवितरण विभागात डेप्युटी एसपी आहेत. काही दिवसांपूर्वी ते ट्रान्सफॉर्मर घोटाळ्याच्या चौकशीसाठी लखनौवरुन आले होते. तेव्हा त्यांची करोना चाचणी केल्यावर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांना ४८ तास क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत अन्य दोन अधिकारीही करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


दरम्यान, आतापर्यंत बॉलिवूडमधील काही कलाकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी करोनावर मात केली असून ते घरी परतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 9:35 am

Web Title: disha patani father jagdeesh patani test coronavirus positive with two more officers ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला धमकीचे फोन?
2 मिस इंडिया फाइनलिस्ट मॉडेलने UPSC परिक्षेत मारली बाजी; पटकावला ९३ वा क्रमांक
3 सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयच्या हाती; केंद्राकडून अधिकृत सूचना
Just Now!
X