26 February 2021

News Flash

त्या चर्चा खोट्याच, दिशाला हृतिकसोबत काम करण्याची संधी मिळालीच नव्हती

दिशाला हृतिकसोबत कोणत्याच चित्रपटाची ऑफर मिळालीच नव्हती अशी माहिती आता समोर येत आहे.

दिशा पटानी

अभिनेत्री दिशा पटानी हिनं हृतिक रोशनच्या फ्लर्टला कंटाळून मोठा चित्रपट सोडला अशा चर्चा कालपर्यंत बॉलिवूडमध्ये होत्या. मात्र दिशाला हृतिकसोबत कोणत्याच चित्रपटाची ऑफर मिळालीच नव्हती अशी माहिती आता समोर येत आहे.

दिशा, टायगर आणि हृतिक यशराज फिल्मच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार होते, मात्र काही कारणानं दिशानं हा चित्रपट नाकारला यामागे हृतिक रोशन असल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र तिला अशी कोणत्याही प्रकारची ऑफर आली नव्हती अशी माहिती दिशाच्या जवळच्या व्यक्तीनं दिली आहे. यशराज फिल्मसारख्या मोठा बॅनर आणि हृतिक सारख्या बड्या कलाकारासोबत काम करण्याची संधी दिशा कधीही गमावणार नाही. मात्र यशराज फिल्मकडून दिशाला कोणत्याही प्रकारच्या चित्रपटाची ऑफर आली नव्हती असं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दिशा सध्या ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. सलमानसोबत बिग बजेट सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्यानं दिशाही खूश आहे. दिशा ‘भारत’ मध्ये ट्रॅपिझ आर्टिस्टची भूमिका साकारत आहे. यासाठी ती विशेष ट्रेनिंगही घेत आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 11:15 am

Web Title: disha patani has not been offered film opposite of hrithik roshan
Next Stories
1 आर. के. स्टुडिओच्या लोगोमागची रंजक कथा तुम्हाला माहित आहे का?
2 पहिल्यांदाच जमणार आलिया-सुशांतची जोडी ?
3 मला बॉलिवूडमध्ये कोण कामच देत नाही, मिलिंद सोमणची खंत
Just Now!
X