बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. नुकतीच ती मालदिवला जाऊन आली. अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिशा काही आठवड्यांपूर्वी सुट्ट्यांच्या आनंद घेण्यासाठी मालदिवला गेली होती. अर्थात तिला मुंबईत परत येऊन बरेच दिवस झालेत. मात्र तरीही सोशल नेटवर्किंगवरुन ती या ट्रीपमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ अजूनही शेअर करताना दिसत आहे. नुकताच तिने स्वत:चा स्नॉर्कलिंग करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे.
रविवारी दिशाने समुद्रामध्ये स्नॉर्कलिंग करतानाचा स्वत:चा एक व्हिडीओ थ्रो बॅक व्हिडीओ म्हणजेच आठवणींमधील व्हिडीओ म्हणून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती लाल बिकिनीमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला दिशाने मजेदार कॅप्शन दिलं आहे. “काही नवे मित्र बनवताना,” अशी कॅप्शन देत दिशाने पुढे मासे आणि डॉल्फीनचे इमोन्जी वापरले आहे. म्हणजेच स्नॉर्कलिंगच्या माध्यमातून आपण माश्यांची मैत्री करण्याचा प्रयत्न केला असं दिशाला म्हणायचं आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच दिशाने असाच एका मालदिवमधील फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दिशाने तिचा ड्रेस आणि फुलांची रंगसंगती कशापद्धतीने सारखीच आहे दे दाखवताना मी फुलांच्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय असं म्हटलं होतं.
View this post on Instagram
त्यापूर्वीही दिशाने मालदिव येथील सुट्ट्यांदरम्यानचे स्वत:चे बिकिनीमधील फोटो शेअर केले होते.
View this post on Instagram
ऑक्टोबर महिन्यामध्येच दिशाने सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या राधे चित्रपटाचे शुटींग पूर्ण केलं. प्रभूदेवाच्या या चित्रपटामध्ये रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ, मेघा आकाश, झारीना वाहाब यासारखे अनेक कलाकार आहेत. राधेबरोबरच दिशा लवकरच एकता कपूरच्या कितना या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 7:56 am