News Flash

सलमानच्या ‘भारत’ला ‘दिशा’ गवसली!

सलमानसोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे असं म्हणत तिनं याचा आनंद व्यक्त केला आहे. सलमान आणि दिशा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

सलमान आणि दिशा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.

सलमाननं अनेक नवख्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये येण्याची संधी दिली आहे. सलमानचं बोट धरून बॉलिवूडमध्ये आलेल्या कलाकारांची यादी बरीच मोठी आहे. तर आता सलमानमुळे दिशा पटानीलादेखील बॉलिवूडमधील करिअरची ‘दिशा’ बहुतेक सापडणार असंच दिसतंय. कारण सलमानचा बिग बजेट ‘भारत’ या चित्रपटासाठी दिशाची निवड पक्की करण्यात आली आहे. प्रियांका चोप्राबरोबरच दिशादेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

वाचा : ‘कोण म्हणतं मेकअप करणाऱ्या महिला बुद्धिवान नसतात?’

‘बागी २’ च्या दमदार यशानंतर दिशाच्या वाट्याला ‘भारत’ या चित्रपटाच्यानिमित्तानं मोठी संधी चालून आली आहे. २५ वर्षांची दिशा या चित्रपटात १९६० च्या सुमारास सर्कसमध्ये काम करणाऱ्या ट्रिपेझ आर्टिस्टची भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे. या सिनेमासाठी जसा चेहरा हवा होता तो दिशाचा आहे. ती अॅथलिटदेखील आहे त्यामुळे या चित्रपटासाठी ती योग्य असल्याचं दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी सांगितलं. सुरुवातीला या चित्रपटात दिशा फक्त कॅमिओ रोल करेन अशा चर्चा होत्या पण तिची भूमिका यापेक्षा अधिक असेल असं म्हटलं जात आहे. सलमानसोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे असं म्हणत तिनं याचा आनंद व्यक्त केला आहे. सलमान आणि दिशा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या चित्रपटात प्रियांकाचीही मुख्य भूमिका असून तब्बल १२ वर्षांनी दोघंही एकत्र काम करणार आहेत.

Royal Wedding : …म्हणून मेगनच्या ब्राइड्समेटच्या यादीतून प्रियांकाला वगळलं?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 1:51 pm

Web Title: disha patani is excited to play role in salman khan bharat movie
Next Stories
1 ‘पोरस’, ‘महाकाली’ मालिकांच्या सेटला आग, संपूर्ण सेट जळून खाक
2 ‘राजी’च्या यशानंतरही मेघना गुलजार यांच्या डोळ्यात पाणी !
3 VIDEO : KKRच्या परदेशी खेळाडूंना शाहरुखची डायलॉगबाजी ऐकवली तेव्हा…
Just Now!
X