25 May 2020

News Flash

टायगर श्रॉफसह असलेल्या नात्याबद्दल दिशा म्हणते…

'भारत' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर परिस्थितीत सुधारणा होईल- दिशा

दिशा पटानी

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हे दोघे अनेका एकत्र डिनर डेटवर जाताना किंवा एकत्र फिरताना दिसत असतात. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्याची अद्याप कबूली दिलेली नाही. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दिशाने तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

बॉलिवूड हंगामासह झालेल्या मुलाखतीमध्ये दिशाला तिच्या आणि टायगरच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान ट्विटरवरील चाहत्याचा देखील एक प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तुम्ही तुमच्या नात्याचा स्विकार का करत नाही? लोकांना तुम्ही एक कपल म्हणून फार आवडता’ असा प्रश्न चाहत्याने विचारला होता. त्यावर दिशाने गेल्या कित्येक दिवसांपासून ती टायगरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तिला यात यश प्राप्त झालेले नाही. ‘भारत’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा दिशाने व्यक्त केली आहे.

‘गेल्या कित्येक वर्षांपासून मी टायगरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत चित्रपटात मी अनेक स्टंट केले आहेत आणि मला असे वाटते की हा चित्रपट पाहिल्यावर टायगर इम्प्रेस होईल. आम्ही एकत्र जेवायला जातो पण याचा अर्थ असा नाही होत की तो इम्प्रेस झालाय. आम्ही दोघेपण खूप लाजऱ्या स्वभावाचे आहोत म्हणून आमच्यात गोष्टी पुढे जात नाहीत’ असे दिशा म्हणाली.

सध्या दिशा तिचा आगामी चित्रपट ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले असून चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ, सुनिल ग्रोवर, जॅकी श्रॉफ आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त दिशा ‘मंगल’ चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटात दिशासह अभिनेता आदित्य रॉय कपूर देखील दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2019 12:16 pm

Web Title: disha patani is talking about her relationship with tiger shroff
Next Stories
1 ठरलं! हृतिकचा सुपर ३० ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला
2 अभूतपूर्व कलाकृती!
3 कुणाचे काय, अन्..
Just Now!
X