News Flash

हृतिकच्या फ्लर्टला वैतागून दिशाने सोडला चित्रपट?

या चित्रपटात दिशाचा कथित प्रियकर टायगर श्रॉफदेखील भूमिका साकारणार होता.

दिशा पटानी, हृतिक रोशन

एका चॉकलेटच्या जाहिरातीतून करिअरची सुरूवात करणाऱ्या अभिनेत्री दिशी पटानीचे आज लाखो चाहते आहेत. अत्यंत कमी काळात दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. ‘बागी २’च्या यशानंतर तिला बऱ्याच चित्रपटांचे ऑफर्सदेखील येऊ लागले. सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. तसंच आणखी एका चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करणार होती. पण दिशाने हृतिकसोबतचा हा चित्रपट अर्ध्यावरच सोडून दिल्याची माहिती समोर येत आहे.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, हृतिकच्या वागण्यामुळे दिशाने हा चित्रपट सोडला आहे. सेटवर हृतिकने दिशासोबत फ्लर्ट करण्याच प्रयत्न केला आणि तिच्या एका जवळच्या मित्राला मेसेज करून तिला डेटवर येण्याबाबत विचारलं, अशी चर्चा आहे. हृतिकची ही गोष्ट दिशाला खटकल्याने नाराज होत तिने चित्रपट सोडल्याचं कळतंय.

वाचा : ‘काकस्पर्श’नंतर महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, गिरीश जोशी पुन्हा एकत्र

चित्रपटातून दिशाच्या अशा अचानक एक्झिटबद्दल दिग्दर्शकांनी अद्याप काही माहिती दिली नाही. पण यामध्ये दिशाचा कथित प्रियकर टायगर श्रॉफदेखील भूमिका साकारणार होता. हा अॅक्शनपट असून यातील स्टंटसाठी आंतरराष्ट्रीय स्टंट कोरिओग्राफरला बोलावण्यात आलं होतं. भारतासह इटली, जॉर्जिया, अबूधाबी, स्विडन आणि पोर्तुगाल याठिकाणी चित्रपटाची शूटिंग होणार आहे.

दिशाने चित्रपटातून काढता पाय घेतल्याने आता दिग्दर्शक तिची मनधरणी करणार का किंवा तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीची यात वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे हृतिक याआधी कंगना रणौतसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 3:29 pm

Web Title: disha patani left yash raj film due to hrithik roshan flirting reports
Next Stories
1 ‘गरज असताना साऱ्यांनीच पाठ फिरवली’
2 ‘काकस्पर्श’नंतर महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, गिरीश जोशी पुन्हा एकत्र
3 Kerala Floods : ‘फक्त आर्थिकच नव्हे तर इतर मार्गांनीही केरळला मदत करा’
Just Now!
X