News Flash

‘बागी चित्रपटांनी मला लोकप्रिय केले’; अभिनेत्रीने मानले टायगरचे आभार

अभिनेत्रीने प्रसिद्धीचे श्रेय दिले टायगर श्रॉफला

मादक अदा, स्टाईलिश लूक आणि धमाकेदार नृत्य शैलीसाठी ओळखली जाणारी दिशा पटानी आज बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. परंतु तिने आपल्या लोकप्रियतेचे श्रेय ‘बागी’ चित्रपट फ्रेंचाईजीला दिले आहे. प्राईम टाईम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिशाने तिच्या करिअरमध्ये ‘बागी’ चित्रपटाने दिलेले योगदान सांगितले.

काय म्हणाली दिशा?

“बागी चित्रपट फ्रेंचाईजीने मला नवी ओळख निर्माण करुन दिली. यासाठी मी निर्माता साजिद नाडियाडवाला आणि टायगर श्रॉफ यांची आभारी आहे. टायगर श्रॉफमुळे आज मी आणखी चांगल्या प्रकारे डान्स करु शकते. यापूर्वी मी काही जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु इतका चांगला अनुभव यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. आज बॉलिवूडमध्ये माझी स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख आहे. या लोकप्रियतेचे संपूर्ण श्रेय ‘बागी’ चित्रपटाला जाते.” असं दिशा या मुलाखतीत म्हणाली.

‘बागी’ ही एक अॅक्शन चित्रपटांची सीरिज आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारतो. बागी सीरिजमधील दुसऱ्या चित्रपटात दिशा पटानी झळकली होती. तिने टायगरच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिसऱ्या चित्रपटात तिने एका आयटम साँगवर डान्स केला होता. हा चित्रपट तिच्या आयटम साँगमुळे चर्चेत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 5:22 pm

Web Title: disha patani said baaghi franchise has helped me a lot mppg 94
Next Stories
1 मोबाइलचा अतिवापर पडला महागात, ‘कोमोलिका’ला झाला ‘हा’ आजार
2 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज रवी जाधव सांगणार ‘न्यूड चित्रपटाचा जन्म आणि प्रवास’
3 “व्हायरस मराठी”चा लॉकडाउन फिल्म फेस्टिव्हल
Just Now!
X