01 March 2021

News Flash

दिशा पटानीच्या ‘मलंग’ सिनेमाचे अँजेलिना जोली कनेक्शन

दिशानेच सांगितले काय आहे कनेक्शन

अभिनेत्री दिशा पटानी ही सध्याच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. तिचा मलंग हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दिशाने चक्क ग्रे शेड असलेली भूमिका साकारली आहे. आता या मलंग सिनेमाचे अँजेलिना जोली कनेक्शनही आहे. नाही तुम्ही विचार करताय तसं काही नाही… अहो म्हणजे अँजेलिना जोली या सिनेमात दिसणार नाही. मात्र दिशा पटानीने जी भूमिका केली आहे त्यासाठीची प्रेरणा तिला अँजेलिना जोलीपासून मिळाली आहे असं तिनेच सांगितलं आहे.

मलंग हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होतो आहे. या संदर्भात पीटीआयने दिशा पटानीची मुलाखत घेतली. या मुलाखतीत तिने आपला मलंग सिनेमातला रोल हा अँजेलिना जोलीपासून प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. “हिंदी सिनेमात अभिनेत्रींना ग्रे शेड असलेली भूमिका करण्याची वेळ खूपच कमीवेळा येते. मला ही संधी मिळाली. त्यामुळे मी ठरवलं की जो रोल करायचा तो चांगलाच करायचा. मला खलनायक आवडतात. तसंच मला निगेटिव्ह भूमिकाही साकारायला आवडतात. अँजेलिना जोली ही या जगातली माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे. ती या जगातली अशी मादक अभिनेत्री आहे जी ग्रे शेड असलेली भूमिकाही अगदी सहज करते. म्हणूनच मलंग या सिनेमासाठी मी तिच्याकडूनच प्रेरणा घेतली आणि या सिनेमात भूमिका केली” असं दिशाने सांगितलं.

मलंग या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तेव्हापासून या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही भूमिका आहेत. त्याचप्रमाणे दिशा पटानीचीही मुख्य भूमिका आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेल्या दिशाच्या हॉट लुकचीही चांगलीच चर्चा आहे. “मी जेव्हा या भूमिकेबद्दल ऐकलं तेव्हाच मी ठरवलं की ही संधी सोडायची नाही. मी तातडीने या रोलसाठी होकार दिला. जेव्हा कोणतीही ग्रे शेड असलेली भूमिका एखाद्या अभिनेत्रीने साकारायची असेल तेव्हा तिने अँजेलिनाच्या भूमिका पाहाव्यात” असाही सल्ला दिशाने दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 9:52 pm

Web Title: disha patani says she took inspiration from angelina jolie for malang role scj 81
Next Stories
1 शेवंताला मिळणार का नाईकांच्या वाड्यात प्रवेश?
2 रिंकू राजगुरूला साकारायचाय ‘या’ महान व्यक्तीचा बायोपिक
3 Video : रिंकूसाठी नेहा कक्करचा आवाज
Just Now!
X