News Flash

“आम्हाला आमचा नवीन कुंग-फू पांडा मिळाला”; दिशा पटानीचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

कुंग-फूमधील दिशाचं हे कौशल्य पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलंय

disha-patani-viral-video

अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. त्याचसोबत दिशा तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. वर्कआउट करतानाचे किंवा तिच्या ट्रेनिंगचे विविध व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच दिशाने कुंग-फू करतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने ट्रॅक पॅन्ट त्यावर काळ क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची स्पोर्टस् ब्रा परिधान केल्याचं दिसतंय. या व्हिडीओत आधी दिशा किक बॉक्सिंग करताना दिसतेय. त्यानंतर तिने दोनदा हवेत फ्लिप केलं आहे. ‘नारुतो’ मधील ‘फ्लिक्सटर’ हे गाणं बॅकग्राऊंडला ऐकू येतंय. दिशा नारुतो सीरिजची चाहती आहे. एका माकडाचं इमोजी शेअर करत दिशाने हा व्हिडीओ शेअर केलाय. कुंग-फूमधील दिशाचं हे कौशल्य पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलंय. दिशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

पहा फोटो: श्वेता तिवारीला लेक देतेय टक्कर, पलकच्या मादक अदांवर नेटकरी घायाळ

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

हे देखील वाचा: बिग बी अमिताभ बच्चन यांनी शेअर केला जया बच्चन यांच्यासोबतचा ४९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ खास फोटो
अनेक नेटकऱ्यांनी तसचं सेलिब्रिटींनी दिशाचं कौतुक केलंय. तर दिशाचा कथित बॉयफ्रेण्ड टायगर श्रॉफने कमेंट बॉक्समध्ये खास इमोजी देत दिशाच्या व्हिडीओला पसंती दिलीय. तर एक युजर कमेंट करत म्हणाला, “लेडी टायगर” तर आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला, “आम्हाला आमचा नवीन कुंग-फू पांडा मिळाला”

दिशा लवकरच मोहित सुरुच्या ‘एक व्हिलन रिटर्न’ सिनेमामध्ये झळकणार आहे. या सिनेमात दिशासोबत अभिनेता अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2021 6:06 pm

Web Title: disha patani share kickboxing skills and kung fu video goes viral kpw 89
Next Stories
1 बिग बी अमिताभ बच्चन यांनी शेअर केला जया बच्चन यांच्यासोबतचा ४९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ खास फोटो
2 बॉलिवूडमध्येही साजरा होतोय शिक्षक दिन; #HappyTeachersDay2021 होतोय ट्रेंड
3 VIDEO: मनी हाईस्टच्या चालीवर लस घ्या सागंणारं ‘हे’ भन्नाट मराठी गाणं ऐकलंत का?
Just Now!
X