बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून दिशा पटानीकडे पाहिलं जातं. दिशा कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येत असते. यावेळी ती अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. दिशाने अलिकडेच एक चित्र इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. हे चित्र तिच्या भावाने काढल्याचं तिने सांगितलं होतं. मात्र, हे चित्र तिच्या भावाने काढलं नसून अर्जेंटिनाच्या इनहोसा या कलाकाराने काढल्याची म्हटलं जात आहे.

दिशाने शेअर केलेलं चित्र फॅन आर्ट असल्याचं म्हटलं जात आहे. हे चित्र शेअर करत तिने “#sketchbysuri my little bro’s आर्ट इन्स्पायर बाय इनहोसो,”अशा आशयाच कॅप्शन दिलं आहे. मात्र, हे चित्र अर्जेंटिनाच्या इनहोसा या कलाकाराचं असून ते क्रॉप करुन शेअर केल्याचं खुद्द इनहोसोने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

#sketchbysuri my little bro’s art inspired by inhoso

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

“माझं जरा चुकलंच, मी झोपेत होतो. पण एक सांगू इच्छितो या अभिनेत्रीने शेअर केलेलं चित्र हे मी काढलेलं आहे. मात्र, आता ते चित्र क्रॉप केलं असून तिच्या भावाने काढल्याचं म्हटलं जात आहे. मी दिशावर कोणताही आरोप करत नाही किंवा कारवाईदेखील करु शकत नाही. कारण ते एक फॅन आर्ट आहे”, असं इनहोसाने सांगितलं.

दरम्यान, हे चित्र इनहोसोने जुलै महिन्यात शेअर केलं होतं. त्यानंतर त्याला दिशाच्या पोस्टची माहिती मिळाली व त्याने सत्य परिस्थिती सांगितली.