बोल्ड आणि स्टायलीश लूकसोबतच दिशा पटानी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. दिशाच्या फिटनेसचं चाहत्यांकडून कायमच कौतुक केलं जातं. बोल्ड अंदाजातील फोटोसोबतच दिशा तिच्या जिमचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकताच एक व्हिडीओ दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.या व्हिडीओला काही तासातच चार लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. दिशाने जिममधील एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात दिशा वेगवेगळे स्टंट करताना दिसतेय. या व्हिडीओवर चाहत्य़ांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. तर अभिनेता टायगर श्रॉफ याने ‘वा… मला देखील हे जमलं असं तर’ अशी कमेंट केलीय. टायगरच्या या कमेंटलाही चाहत्यांनी लाईक दिले आहेत.
View this post on Instagram
याआधीदेखील दिशाने तिचे जिममधले अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. व्यायाम करण्यासोबतच दिशा डाएटकडे कायम लक्ष देताना दिसते. दिशा पटानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दिशा तिचे हॉट अंदाजातले फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ करताना दिसते. तर फिटनेसच्या बाबतीतदेखील दिशा चर्चेत राहते. सलमान खानच्या ‘राधे’ या आगामी सिनेमातून दिशा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 3:44 pm