02 March 2021

News Flash

टायगरच्या आई-बाबांसोबत दिशाने घालवला ‘क्वालिटी टाइम’

दिशा दुपारी सुमारे २ च्या सुमारास टायगरच्या घरी गेली

दिशा पटानी- टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर कासवाच्या गतीने पळतोय. पण टायगरला त्याची कथित प्रेयसी दिशा पटानीकडून चांगल्या कामाची पोचपावती मिळाली. दिशाला टायगचे काम फार आवडले आणि तिने त्याचे भरपूर कौतुकही केले. दिशाने सिनेमा पाहून झाल्यानंतर टायगर हा स्टार असल्याचे म्हटले. दिशा दुपारी सुमारे २ च्या सुमारास टायगरच्या घरी गेली होती आणि संध्याकाळी उशिरा तिथून निघाली. दिशा जेव्हा टायगरच्या घरी गेली होती तेव्हा टायगरचे आई बाबा म्हणजे जॅकी आणि आएशा श्रॉफ घरी उपस्थित होते.

या अभिनेत्रीमुळेच अनुष्का शर्मा झाली अभिनेत्री

टायगर आणि दिशाने नेहमीच आपल्या नात्याबद्दल गुप्तता बाळगली. दोघांनीही एकमेकांना फक्त चांगले मित्र आहोत असेच दाखवले. पण तरीही अनेकदा या दोघांची केमिस्ट्री सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते. एकीकडे टायगरचे ‘मुन्ना मायकल’ सिनेमातील त्याच्या डान्ससाठी सर्व स्तरांवर कौतुक होत आहे तर दुसरीकडे दिशाला गेल्या आठवड्या न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. टायगर आणि दिशा लवकरच ‘बागी २’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ‘बागी २’ हा सिनेमा ‘बागी’चा सिक्वल आहे. या दोघांनी आधी एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे.

जेव्हा ‘बागी २’ ची घोषणा झाली तेव्हा टायगरने सांगितले होते की, ‘दिशासोबत स्क्रिन शेअर करणं त्याच्यासाठी सहज होऊन जातं. आम्ही फार चांगले मित्र असल्यामुळे तिच्यासोबत काम करताना कोणतंही दडपण येत नाही. आम्ही दोघंही एकमेकांसोबत फार कंफर्टेबल असतो. आपलं काम जास्तीत जास्त चांगलं कसं होईल याबद्दल आम्ही दोघंही आग्रही असतो. त्यामुळेच नेहमीच सर्वोत्तम काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो.’

Video: ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा हा व्हिडिओ पाहिलात का?

दिशाचा शेवटचा सिनेमा कुंग फू योगा होता. जॅकी चॅनसोबत काम करण्याबाबत दिशा म्हणाली होती की, ‘त्याच्यासोबत काम करणं हे स्वप्नपुर्तीपेक्षा कमी नाही.मी त्याची चाहती होती आणि आतात तर त्याच्यासोबत काम केल्यानंतर अजून फार मोठी चाहती झाली आहे. तो ज्या पद्धतीने मेहनत घेतो ते खरंच थक्क करुन सोडतं. या वयातही तो फार कणखर आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 4:45 pm

Web Title: disha patani spends quality time with tiger shroff and his parents
Next Stories
1 Video: ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा हा व्हिडिओ पाहिलात का?
2 या अभिनेत्रीमुळेच अनुष्का शर्मा झाली अभिनेत्री
3 …म्हणून रिचा शिकतेय मराठीची बाराखडी
Just Now!
X