19 January 2021

News Flash

video : वाढदिवसानिमित्त टायगरकडून दिशाला ‘खास’ शुभेच्छा

सिनेसृष्टीत दिशा व अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री दिशा पटानीचा आज, १३ जूनला वाढदिवस असून त्यानिमित्त तिचा जवळचा मित्र टायगर श्रॉफने तिच्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. टायगरने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये ते दोघंही नृत्याचा सराव करताना दिसत आहेत.

दिशाने एका चॉकलेटच्या जाहिरातीतून तिच्या अभिनय प्रवास सुरु केला. अत्यंत कमी वेळात दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. या चित्रपटानंतर दिशाच्या करिअरला कलाटणी मिळाली आणि आता ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. सिनेसृष्टीत दिशा व अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हे दोघे अनेकदा डिनर डेटवर जाताना किंवा एकत्र फिरताना दिसतात. दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना टायगरने ‘हॅपी बर्थ डे डी’ असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचं नृत्यकौशल्य दिसून येतंय. या दोघांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ बघणे आनंदाचे आहे.

दिशा वाढदिवस साजरा करणार असली तरीही ती ‘मलंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिशा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नसून ती रात्री तिच्या जवळच्या माणसांसोबत जेवायला जाणार आहे. दिशा म्हणाली की, “मला आठवत नाहीये की शेवटची मी कधी बर्थ डे पार्टी केली असेल.” “टायगर श्रॉफ या डिनरला येणार आहे की नाही?” हे दिशाला विचारले असता ती म्हणाले की, “अजून माझे काहीच प्लॅन्स नाहीयेत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2019 2:04 pm

Web Title: disha patani tiger shroff birthday djj 97
Next Stories
1 बॉलिवूडमधील घराणेशाहीविषयक चर्चा मूर्खपणाच्या – तारा सुतारिया
2 अमिताभ बच्चन यांनी वापरलेली मर्सिडीज OLX वर विक्रीला
3 ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या दिशाचं आज कोट्यवधींचं घर
Just Now!
X