News Flash

दिशा पटानीचे हॉट फोटोशूट पाहिले का?

तिला सोशल मीडिया क्वीन म्हटले जाते

अभिनेत्री दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कामात कितीही व्यग्र असली तरी ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करायला विसरत नाही. वेळात वेळ काढून ती आपले नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करतच असते. नुकतेच तिने ‘मॅक्सिम’ या मासिकासाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. २०१६ मध्ये ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळेही ती तितकीच चर्चेत असते.

दिशाचा कथित प्रियकर टायगर श्रॉफसोबतची तिची कोणतीही भेट झपाट्याने व्हायरल होते. या दोघांनी आपले प्रेमसंबंध अजूनपर्यंत मान्य केले नसले तरी अनेकदा ते दोघं एकत्र फिरताना दिसतात. टायगरशिवाय दिशा तिच्या बोल्ड फोटो शूटसाठीही नेहमी चर्चेत असते. म्हणूनच तिला सोशल मीडिया क्वीन म्हटले जाते. यावेळीही फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर टाकताना तिने लिहिले की, ‘हे ‘मॅक्सिम इंडिया’चे फोटो आहेत जे सर्वात टॅलेंटेड फोटोग्राफरने क्लिक केले आहेत.’

दिशा सध्या टायगरसोबत ‘बागी २’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. नुकतेच या सिनेमाचे पहिले शेड्युल संपले असून, लवकरच पुढील चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. पहिल्या शेड्युलवेळी दिशा आणि टायगरने एकत्र स्विमिंग पूलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांचा हा फोटो कमालीचा व्हायरल झाला होता. दिशाने हॉलिवूड स्टार जॅकी चॅनसोबत ‘कुंग फू योगा’ काम केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा लवकरच तामिळ ऐतिहासिक सिनेमा ‘संघमित्रा’मध्ये काम करणार आहे. या सिनेमासाठी आधी श्रुती हसनच्या नावाचा विचार करण्यात आला होता. पण काही कारणांमुळे श्रुतीला हा सिनेमा सोडावा लागला होता. यानंतर निर्मात्यांनी दिशाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. हा सिनेमा तामिळसोबतच हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दिशासोबत जयम रवि आणि आर्य यांच्या मुख्य भूमिका असतील. ए. आर. रेहमान याचे या सिनेमाला संगीत लाभले आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला साधारणपणे डिसेंबरपासून सुरूवात होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 4:33 pm

Web Title: disha patani tiger shroff maxim photo shoot viral boyfriend viral photo
Next Stories
1 …या व्यक्तीमुळे अक्षया देवधर करतेय ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये काम
2 BLOG : थ्री-डी स्वरुपातील ‘पद्मावती’च्या निमित्ताने…
3 ‘पद्मावती’च्या ‘क्लायमॅक्स’मधील दृश्य पाहिले का?
Just Now!
X