21 September 2020

News Flash

‘दया बेन’ला ‘तारक मेहता..’मध्ये परतण्यासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

दिशा वकानी सप्टेंबर २०१७ पासून रजेवर आहे.

दिशा वकानी

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील लोकप्रिय दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी सप्टेंबर २०१७ पासून सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर दिशा मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण अजूनही ती कामावर न आल्याने तिला आता ३० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, दिशाने ३० दिवसांत निर्णय न घेतल्यास तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं जाईल, असा अल्टिमेटम मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दिला आहे.

याआधी दिशाने परतण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने काम करण्याच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. आता दिशा या अल्टिमेटमला काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिली. पण यापुढे मालिकेच्या कथानकाची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणं योग्य नसल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 3:13 pm

Web Title: disha vakani given a 30 day ultimatum to return to taarak mehta ka ooltah chashmah
Next Stories
1 सूरज पांचोली ‘सॅटेलाइट शंकर’ची पूर्ण कमाई देणार लष्कराला
2 तुमच्या आवडत्या मालिकांचे पहा विशेष भाग
3 #PMNarendraModiTrailer: ‘मोदींच्या बायोपिकवर बंदीची भाजपाचीच मागणी’, मिम्स झाले व्हायरल
Just Now!
X