13 December 2018

News Flash

हे माँ माताजी… दयाबेन मालिका सोडणार?

मालिकेचे निर्माते आता नवीन कलाकाराच्या शोधात

टीव्हीवर सर्वात जास्त टीआरपी कमवत असलेला कोणता कार्यक्रम असेल तर तो तारक मेहता का उल्टा चष्मा हा आहे. पण लवकरच या मालिकेतून दयाबेन ही सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी आपले मत दिले आहे. मोदी म्हणाले की, ‘दिशाची मुलगी फार लहान आहे. मुलीला दिशाची गरज आहे. दिशासोबत ती मालिकेत कधी परतणार याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. शिवाय दिशाकडूनही मालिका सोडण्याबद्दल काही सांगितले नाही. त्यामुळे इतक्यात दिशा ही मालिका सोडणा असे आपण बोलू शकत नाही.’

दिशाने गरोदरपणात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या चित्रीकरणामध्ये ब्रेक घेतला होता. तेव्हा असे म्हटले जात होते की, मालिकेचे निर्माते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. पण नंतर निर्माते असित मोदीने दिशाच या मालिकेचा हिस्सा असेल असे स्पष्ट केले होते. तिने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शेवटचे चित्रीकरण केले होते.

दिशा वकानीने २४ नोव्हेंबर २०१५ ला मुंबईस्थित मयूर पांडा याच्याशी लग्न केले होते. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेचे निर्माते आता नवीन कलाकाराच्या शोधात आहेत. सब टीव्हीची ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका प्रेक्षकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. ही मालिका लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सारेच आवडीने पाहतात. गेल्या अनेक वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने टॉप- १० मधील आपले स्थान कधीही हलू दिलेले नाही. दिशाने या मालिकेशिवाय ‘जोधा- अकबर’, ‘देवदास’, ‘लव स्टोरी २०५०’ आणि ‘मंगल पांडे- द रायझिंग’ सिनेमात काम केले.

First Published on March 12, 2018 6:38 pm

Web Title: disha vakani play dayaben quitting tarak mehta ka ulta chashma producer talk about