News Flash

२४ वर्षीय अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून चौकशी सुरु

पहिल्याच मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता काळाच्या पडद्याआड

हॉलिवूड अभिनेता सेबॅस्टियन अ‍ॅथी याचा मृत्यू झालं आहे. तो केवळ २४ वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप कळलेलं नाही. द सनने दिलेल्या वृत्तानुसार पोलीस त्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. डिस्ने वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सेबॅस्टियनच्या मृत्यूची बातमी दिली गेली.

“रेस्ट इन पीस सेबॅस्टियन, तू आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर सर्वांचंच मन जिंकलंस. तुझं अचानक आम्हाला सोडून जाणं धक्कादायक आहे. तुझा अभिनय, तुझं हास्य, तुझा दिलदारपणा कायम स्मरणात राहिल. ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” अशा आशयाचे ट्विट करुन डिस्ने वाहिनीने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. हे ट्विट स्पॅनिशमध्ये केले आहे.

सेबॅस्टियन स्पॅनिश मनोरंजन सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता होता. ‘वन्स’ या टीव्ही मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता. या मालिकेला O11CE या नावानेही ओळखले जाते. मालिकेत त्याने लोरेंजो ग्वेरा ही व्यक्तिरेखा साकारली होती. आपल्या पहिल्याच मालिकेमुळे तो लोकप्रिय अभिनेता झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 6:31 pm

Web Title: disney star sebastian athie dead at 24 mppg 94
Next Stories
1 “90 days credit चं भूत अजूनही मानगुटीवर”; कलाकारांचे पैसे थकवणाऱ्यांवर भडकली हेमांगी कवी
2 सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे सतत रडतोय करण जोहर; जवळच्या मित्राचा खुलासा
3 “इंडस्ट्रीमध्ये पक्षपातीपणा खूप आहे”; जॉनी लिव्हरच्या मुलीचा खुलासा
Just Now!
X