News Flash

हॉलिवूडचा ‘हा’ अभिनेताही देसी गर्लच्या प्रेमात ?

हॉलिवूडचा एक अभिनेताही प्रियांकाचा चाहता झाल्याचं दिसून येत आहे.

क्वांटिको गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हॉलिवूडचा एक अभिनेताही प्रियांकाचा चाहता झाल्याचं दिसून येत आहे.

काही दिवसापूर्वी प्रियांकाने हॉलिवूडमधील एका अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती.यावेळी प्रियांकासोबत हॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारही उपस्थित होते.यामध्ये हॉलिवूड अभिनेता ह्युज जॅकमॅन हादेखील उपस्थित होता. यावेळी ह्युज प्रियांकाकडे एकटक पाहत असल्याचा दिसून येत आहे. सध्या ह्युज आणि प्रियांकाचा हा फोटो चांगला व्हायरल झाला असून ह्युज प्रियांकाचा चाहता झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

या सोहळ्याप्रसंगी प्रियांका एका व्यक्तीसोबत संवाद साधत होती. तर ह्युजदेखील वोग मासिकाच्या मुख्य संपादक अॅना विंटर यांच्यासोबत संवाद साधण्यात मग्न होता. यावेळी ह्युजची नजर प्रियांकाकडे वळली आणि तो काही काळ तिच्याकडेच पाहत बसला. त्यामुळे ह्युजचा हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

दरम्यान, प्रियांकाने बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही आपली जादू दाखविली आहे. या हॉलिवूडमध्येच प्रियांकाला तिचा जोडदार निक जोनास मिळाला असून ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 6:44 pm

Web Title: distracted much this photo of priyanka chopra and hugh jackman is taking over the internet
Next Stories
1 कौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य
2 #MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न
3 #MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती
Just Now!
X