24 October 2020

News Flash

यंदाचा व्हॅलेन्टाईन डे स्पेशल होण्यासाठी रेमो डिसोजाचे खास गिफ्ट

तहान, भूक, विसरून जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी एकच एक व्यक्ती दिसू लागते.

दिसू लागलीस तू

पहिल्या प्रेमाची नशा काही औरच असते. तहान, भूक, विसरून जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी एकच एक व्यक्ती दिसू लागते. आणि ती प्रिय व्यक्ती प्रतिसाद देते तेव्हा गुलाबी झालेले मन त्या व्यक्तीमध्ये आकंठ बुडू लागते. असे काहिसे तुमच्या बाबतीत झाले असेल किंवा होत असेल तर यंदाचा व्हॅलेंटाइन तुमच्यासाठी आणखी रोमॅण्टिक होईल. कारण, प्रसिद्ध नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाने एका विशेष संगीतमय नजराण्याचे अनावरण केले. हा नजराणा म्हणजे आगामी येणाऱ्या गावठी या चित्रपटातील एक रोमॅण्टिक गाणे आहे. ‘दिसू लागलीस तू’ हे अश्विन भंडारे यांनी संगीत आणि स्वरबद्ध केलेले प्रेमगीत रेमोने व्हॅलेंटाइन डे स्पेशल गिफ्ट म्हणून चाहत्यांना समर्पित केले आहे.

वाचा : व्हॅलेंटाइन व्हाया ‘What’s up लग्न’

गावठी चित्रपटाचे कॉरिओग्राफर, कथा लेखक तसेच दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) हे गेली पंधरा वर्षे रेमो डिसोजा यांचे सहायक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या प्रेमगीताच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला रेमो आपल्या पत्नी लीझल यांच्यासोबत उपस्थित होता. गुरू रेमोच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या आनंदकुमार यांच्या सिनेमाचे दिग्दर्शन, संगीत तसेच नृत्य दिग्दर्शन हे दिलखेचक असणार हे ओघाने आलेच. या प्रेमगीतासाठी एक स्पेशल सिग्नेचर डान्सस्टेप कोरिओग्राफर आनंदकुमार यांनी चित्रीत केली आहे.

वाचा : ‘गुलमोहर’मध्ये नवी प्रेमकथा अनामिका

या गाण्याचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईच्या जे. डब्ल्यु. मॅरीएट या पंचतारांकीत हॉटेल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपटातील हिरो-हिरॉईन श्रीकांत आणि योगिता हे नवोदित कलाकार सोहळ्यात ‘त्या’ प्रेमगीतावर बहारदार नृत्य सादर करत असताना रेमो डिसोजा आणि दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) यांनी न राहावल्याने स्टेजवर अचानक एंट्री घेतली आणि उपस्थितांनीही त्या स्पेशल डान्सस्टेपवर ताल धरला.

‘दिसू लागलीस तू’ हे व्हॅलेंटाइन स्पेशल प्रेमगीत आणि डान्सस्टेप गावठी सिनेमाच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्युब चॅनलवर पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 3:19 pm

Web Title: disu lagalis tu valentine special song in gaavathi movie
Next Stories
1 PHOTO : इशानचे जान्हवीसाठी कायपण!
2 आमिरची उंची
3 सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे सेलिब्रिटी कपलच्या नात्यात तणाव
Just Now!
X