News Flash

समीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळालेला ‘दिठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

21 मेला सोनी लिव्हवर होणार रिलीज

सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे यांनी काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला आहे. सुमित्रा भावे यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीतील सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेला ‘दिठी’ हा सिनेमा लवकरत सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. सोनी लिव्ह ओरिजिनल्सवर 21 मे ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात एका साध्या लोहराची कथा आपल्यासमोर येते. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दु:ख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. या सिनेमात अनेक बड्या कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

ग्रामीण जीवनावर आधारित या सिनेमात आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूने बापावर ओढावलेलं दु:ख, त्याच्या तरुणी पत्नीवर आलेलं संकट त्यातून होणारी मनाची घालमेल याचं चित्रण रंगवण्यात आलंय. या सिनेमात डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम. कैलास वाघमारे, अमृता सुभाष आणि गिरीश कुलकर्णी असे उत्तम कलाकार आहेत. प्रसिद्ध मराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासी आले’ या कथेवर आधारित हा सिनेमा आहे.

सुमित्रा भावे यांना 6 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 11 राष्ट्रीय पुरस्कार आणि 45 हून अधिक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या असंख्य कथा, पटकथा, गीते, त्यांचे कला दिग्दर्शन, वेशभुषा आणि दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी मानांकित करण्यात आले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सुमित्रा भावे यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 4:55 pm

Web Title: dithee marathi movie relesing on sony liv on 21 may amruta subhas mohan agashe best star cast kpw 89
Next Stories
1 सरोज खानची आठवण काढत भावूक झाली माधुरी दीक्षित
2 …म्हणून पहिल्याच चित्रपटातून सैफला दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता
3 “या पोस्टसाठी किती पैसे मिळाले”; ट्रोल करणाऱ्या युजरला सोनम कपूरने केलं ब्लॉक
Just Now!
X