News Flash

‘विराट वडिलांच्या निधनानंतर खेळू शकतो, मग मी का नाही?’; ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली

वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; झाली ट्रोलिंगची शिकार

अभिनेत्री दिव्या अग्रवाल आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिने आपल्या वडिलांच्या निधनानंतर एक ग्लॅमरस फोटोशूट केलं होतं. हे फोटो तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. मात्र या फोटोंमुळेच ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या फोटोंमुळे दिव्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. मात्र ही टीका पाहून अभिनेत्री शांत बसली नाही, उलट तिने देखील टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे दिव्याने स्वत:ची तुलना भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी करत ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

आठवड्याभरापूर्वी दिव्याच्या वडिलांचं करोनामुळे निधन झालं. लक्षवेधी बाब म्हणजे वडिलांच्या निधनानंतर तिने आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिची ही कृती काही नेटकऱ्यांना आवडली नाही. अन् त्यांनी दिव्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलर्सला आता तिने प्रत्युत्तर दिलं आहे.

 

“आपण अशा एका देशात राहतोय जिथे विराट कोहली वडिलांच्या निधनानंतर खेळू शकतो. शिवाय त्याच्या खेळीचं कौतुक देखील केलं जातं. पण मी वडिलांच दु:ख विसरुन पुढे जाणाच्या प्रयत्न केला तर मात्र काही जणांना आवडत नाही. ते मला ट्रोल करतात. मी काय करावं अन् काय नाही हे माझे स्वत:चे निर्यण आहेत. मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. येत्या काळात मी रॉकेटच्या वेगाने पुढे जाणार आहे. तुम्ही मला थांबवू शकणार नाही.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करत दिव्याने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 2:47 pm

Web Title: divya agarwal compares herself to virat kohli mppg 94
Next Stories
1 नव्या भूमिकेसाठी किंग खान सज्ज; लवकरच सुरु होणार ‘या’ चित्रपटाची शुटींग
2 बिपाशाने करणसोबत शेअर केला रोमॅण्टिक फोटो; म्हणाली…
3 लग्नानंतर नेहाचा पहिला करवाचौथ; शेअर केला खास व्हिडीओ
Just Now!
X