News Flash

वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; झाली ट्रोलिंगची शिकार

वडिलांच्या निधनानंतर सातच दिवसात 'या' अभिनेत्रीने केले ग्लॅमरस फोटो शेअर

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल आपल्या ग्लॅमरस फोटो आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ‘नो वुमन नो क्राईम’ असं म्हणणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमुळे तिच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

अवश्य पाहा – ‘गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करायचं आहे का?’; त्या व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे विरोधात तक्रार

नुकतेच तिच्या वडिलांचं करोनामुळे निधन झालं. लक्षवेधी बाब म्हणजे वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांतच तिने आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करणं काही नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. त्यांनी दिव्यावर जोरदार टीका केली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर सातच दिवसात असं फोटोशूट करणं योग्य आहे का? असा सवाल करत तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

अवश्य पाहा – ‘अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलतायेत?’; महेश टिळेकर यांचा सवाल

सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगवर दिव्याने देखील संताप व्यक्त केला आहे. “या क्षणी मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? वडिलांचं निधन हे माझ्या आयुष्यातील कधीही भरुन न निघणार असं दु:ख आहे. पण या क्षणी मी केवळ रडत बसावं, आरडा ओरडा करावा असं तुम्हाला वाटतं का? खरंच हे जग खूप क्रूर आहे. लोकांना दु:खात बघून आनंद मानणाऱ्या लोकांची काही कमी नाही.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून तिने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 5:56 pm

Web Title: divya agarwal troll due to glamorous photos after her fathers death mppg 94
Next Stories
1 कपिलने मुलीविषयी केला खुलासा; हिंदी नव्हे तर ‘या’ भाषेत देते उत्तर
2 बिग बींनी शेअर केला अभिषेकसोबतचा फोटो; म्हणाले…
3 निक्की तांबोळीने पँटमध्ये लपवला मास्क; भडकलेल्या नेटकऱ्यांनी घेतला समाचार
Just Now!
X