ती केवळ १४ वर्षांची असताना तिला चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यावेळी ती बहुधा नववीत शिकत असावी. प्रत्येक दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक होता. इतकेच नव्हे तर तिला चित्रपटात काम करण्याची परवानगी देण्यासाठी तिच्या आई – वडिलांनाही गळ घालण्यात आलेली. अखेर तिने वयाच्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत सर्वांनाच आपल्या अदांनी घायाळ केलं. त्या अभिनेत्रीचे नाव होतं दिव्या भारती.

दिव्या भारतीने पदार्पणाच्या काही वर्षांतच सुपरस्टार म्हणून ओळख मिळवली. केवळ तिच्या अभिनयावरच लोक भाळले नव्हते. तर तिच्या सौंदर्यावरही अनेकजण घायाळ झालेले. त्यावेळी निर्माते दिव्याला आधीच चित्रपटासाठी साइन करून घेत होते. त्याचमुळे, दिव्याच्या निधनानंतर तिने साइन केलेले अनेक चित्रपट अर्धवटच राहिले. शेवटी दिग्दर्शकांना दुसऱ्या अभिनेत्रींसोबत पुन्हा चित्रीकरण करावं लागलं. दिव्याचे बरेचसे चित्रपट नंतर हिट ठरले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘मोहरा’.

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

वाचा : .. या आयटम गर्लचे मानधन ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

खूप कमी जणांना माहित असेल की, ‘मोहरा’चे दिग्दर्शक राजीव राय यांनी सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून दिव्याला चित्रपटात घेतले होते. तिने या चित्रपटातील काही दृश्यंही चित्रीत केली होती. पण, त्याच दरम्यान आलेल्या दिव्याच्या मृत्युच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. राजीव रायचा ‘मोहरा’ शेवटी अर्ध्यावरच लटकला. त्यानंतर नव्या हिरोईनचा शोध घेत असताना राजीव रायने रविना टंडनला चित्रपटात घेतले. त्यावेळी रविना बरीच चर्चेत होती. तेव्हा ती चित्रपटसृष्टीत नवीन होती. पण तिच्या पदार्पणातील चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळालेली. तिचा ‘दिलवाले’ चित्रपट हिट झाला होता.

वाचा : महिला टीम इंडियाला हुमा देणार बिर्याणी पार्टी

१९९४ मध्ये ‘मोहरा’ प्रदर्शित झाला आणि त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तो दुसरा चित्रपट होता. पुरस्कार सोहळ्यांमध्येही या चित्रपटाने नाव कमविले. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला नऊ नामांकन मिळाली होती. रविनाच्या अभिनयाचीही बरीच प्रशंसा झाली होती. ‘मोहरा’ च्या यशाने रविनाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले. त्यानंतर ती अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये झळकली.