11 July 2020

News Flash

Video: रॅम्पवर तुटलं लेहंग्याचं बटण; अभिनेत्रीने सावरला प्रसंग

पायात अडकलेला लेहंगा नीट करताना अचानक कमरेजवळचं बटणच तुटलं.

दिव्या खोसला कुमार

कलाविश्वातल्या तारेतारकांना उत्तमोत्तम पोशाख परिधान करून आपलं सौंदर्य जगासमोर सादर करण्याची संधी देणारा शो म्हणजे ‘लॅक्मे फॅशन वीक’. यंदाच्या फॅशन शोमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. नव्या अभिनेत्रींनी आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉक केला. त्यातच एका अभिनेत्रीला मात्र रॅम्प वॉक करताना अडचणीचा सामना करावा लागला. ही अभिनेत्री आहे ‘टी सीरिज’चे मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार.

दिव्याने चंदेरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्याचा आकार खूप मोठा असल्याने रॅम्प वॉक करताना तिच्या पायात तो अडकला. पायात अडकलेला लेहंगा नीट करताना अचानक कमरेजवळचं बटणच तुटलं. अशा परिस्थितीतही चेहऱ्यावर जराही गोंधळलेला भाव न आणता दिव्याने आत्मविश्वासाने रॅम्प वॉक पूर्ण केला.

आणखी वाचा : अग्गंबाई सासूबाई : शुभ्रा-सोहमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री

दिव्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक होत आहे. तर काहीजण हा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका करत आहेत. मोठमोठ्या फॅशन शोमध्ये अशाप्रकारची घटना घडल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा अभिनेत्रींना, मॉडेल्सना अशा परिस्थितींना सामोरं जावं लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 7:16 pm

Web Title: divya khosla kumar avoids wardrobe malfunction lakme fashion week 2020 ssv 92
Next Stories
1 ‘नवरी मिळे नवऱ्याला’ फेम सायली देवधर अडकली लग्नबंधनात
2 Mr India 2 मध्ये ‘मोगॅम्बो खुश हुआ’ म्हणणार ‘हा’ आघाडीचा अभिनेता
3 अन् नेहा कक्करनं दिली दोन-दोन हजारांच्या नोटेची भीक
Just Now!
X