News Flash

‘गुस्सा थूक दो वरना शेरू जी के श्राप से…’ दिव्या खोसला यांचे ट्रोलर्सला उत्तर

त्यांनी सोशल मीडियावर शेरु सोबत फोटो शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गायक सोनू निगम आणि टी-सीरिज यांच्यामध्ये वाद सुरु आहे. यावादावर निर्माते भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार यांनी सोनू निगमला उत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला दाखवले होते. पण स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला व्हिडीओमध्ये घेतल्यामुळे दिव्या यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आता दिव्या यांनी एक पोस्ट करत ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

नुकताच दिव्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या घरात स्वयंपाक करणाऱ्या शेरुसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिव्या दही-जिलेबी खाताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘माझ्या वर्ल्ड फेमस कुकसोबत एक फोटो, शेरुने बनवलेली मिठाई खा आणि राग कमी करा. नाही तर शेरुच्या शापाने तुमचे नाक मोठे होईल’ असे त्यांनी फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले असून ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

दिव्या खोसला कुमार यांनी ११ मिनिटांच्या व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी टी-सीरिजने अनेक बाहेरुन आलेल्या गायक, म्यूझिक दिग्दर्शक, कलाकारांना संधी दिल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी भूषण कुमार यांच्यावर लावण्यात आलेल्या मिटू आरोपांवरही वक्तव्य केले होते. दरम्यान त्यांनी सोनू निगमला उत्तर देण्यासाठी त्यांच्या घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला देखील घेतले होते.

गुलशन कुमार यांनी सोनू निगमला दिल्लीमध्ये रामलीलामध्ये पाहिले होते. त्यानंतर त्यांनी सोनू यांना विमानाची तिकिटे देऊन मुंबईला येण्यास सांगितले होते. गुलशन कुमार यांनी सोनू निगमला बेटा तुला मोठा स्टार बनवेन असे म्हटले असल्याचे दिव्या यांनी पुढे सांगितले होते. दरम्यान दिव्या यांनी त्यांच्या घरात गेली कित्येक वर्षे स्वयंपाक करणाऱ्या शेरुला तेथे बोलावले. पण नेटकऱ्यांना ते फारसे आवडले नव्हते. नेटकऱ्यांनी दिव्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली होती. आता दिव्या यांनी पोस्ट करत नेटकऱ्यांना उत्तर दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 7:53 pm

Web Title: divya khosla kumar took a class of trollers avb 95
Next Stories
1 ‘सडक २’ चे पोस्टर प्रदर्शित केल्यावर आलियाने उचलले मोठे पाऊल?
2 सलमानचं करिअर डेंजर झोनमध्ये? ऑनलाईन पोलमध्ये भाईजानला नेटकऱ्यांची नापसंती
3 Instagram Rich List 2020: ड्वेन जॉन्सन एका पोस्टसाठी घेतो ७ कोटी रुपये
Just Now!
X