19 February 2019

News Flash

पहिल्यांदाच ‘शेफ’च्या भूमिकेत झळकणार दिव्यांका

मालिका जरी संपली तरीदेखील दिव्यांका नव्या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

दिव्यांका त्रिपाठी

टेलिव्हिजनची सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. ‘ये है मोहब्बते’ मालिकेतील आदर्श सून ‘इशिता’ची भूमिका साकारणारी दिव्यांका घराघरांत पोहोचली. तिला या लोकप्रियतेसोबतच चाहत्यांचंही भरभरून प्रेम मिळालंय. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मालिका जरी संपली तरीदेखील दिव्यांका नव्या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावर लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणाऱ्या एकता कपूरच्या आगामी एका वेबसीरिजमध्ये दिव्यांका झळकणार असून या आगामी वेबसीरिजचं नाव ‘शेफ’ असं आहे. या वेबसीरिजमध्ये दिव्यांका एका शेफच्या भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजचं चित्रीकरण सुरु झालं. मात्र एकताने अद्याप या सीरिजची अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘ये है मोहब्बते’ या मालिकेची निर्मितीही एकता कपूरने केली असून तिने तिच्या आगामी वेबसीरिजसाठीही दिव्यांकाची निवड केली आहे. ‘ये है मोहब्बते’ ही लोकप्रिय मालिका येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बंद होणार आहे. त्यामुळे पाच वर्षापासून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही मालिका आता प्रेक्षकांना पाहता येणार नाही.

टीआरपीमध्ये अव्वल स्थानी असलेली मालिका अचानक एक्झिट घेणार असल्यामुळे साऱ्यांच्याच नजरा उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून लोकप्रिय असलेली अभिनेत्री दिव्यांका सोशल मीडियावर सतत ट्रोल होत आहे. तसंच रेटिंगमध्येही ही मालिका मागे पडली आहे. या साऱ्या कारणांमुळे मालिकेचा टीआरपी कमालीचा घसरला आहे. त्यामुळेच ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

First Published on September 7, 2018 11:48 am

Web Title: divyanka tripathi new serial social media