News Flash

…म्हणून चित्रपटगृहाच्या बाहेर दिव्यांकाने त्या व्यक्तीच्या कानाखाली लगावली

चाहत्यांशी संवाद साधताना तिने हा खुलासा केला आहे

छोट्या पद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ये है मोहब्ब्तें.’ या मालिकेने अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली. आता दिव्यांकाचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधत असते. नुकताच दिव्याकाने अशाच एका संवादामध्ये सर्वाजनिक ठिकाणी व्यक्तीच्या कानाखाली लगावली असल्याचे सांगितले आहे.

दिव्यांकाने तिच्या इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी तिने तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली मारल्याचे सांगितले. ‘ही घटना माझ्यासोबत चित्रपट गृहात घडली होती. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा चित्रपटाचे तिकीट ब्लॅकने विकले जायचे. त्यावेळी चित्रपटगृहांच्या बाहेर प्रचंड गर्दी असायची’ असे दिव्यांका म्हणाली.

आणखी वाचा : दिव्यांकाने क्वारंटाइन केंद्रातील टॉयलेट फोटो शेअर करताच नेटकऱ्याने सांगितला अनुभव

‘मी चित्रपट पाहायला गेले होते. तेव्हा तेथे तिकिट खिडकीजवळ खूप गर्दी होती. मी तिकिट काढायला गेले आणि तेथे माझ्या बाजूला असणारा व्यक्ती माझ्यासोबत गैरवर्तन करु लागला. मला राग आला आणि मी त्याच्या कानशिळात लगावली. मी त्या व्यक्तिचा चेहरा देखील पाहिला नाही’ असे दिव्यांका पुढे म्हणाली.

सध्या लॉकडाउनच्या काळात दिव्यांका पती विवेक दहियासोबत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच दिव्यांकाच्या भावाला करोना झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. तेव्हा दिव्यांकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 11:17 am

Web Title: divyanka tripathi said a man tried to touch her inappropriately and she slapped him avb 95
Next Stories
1 अभिनेते रणजित चौधरी कालवश
2 “माझ्या पाकिटात कायम चार्ली चॅप्लिनचा फोटो असतो, कारण…”; अक्षय कुमारनेच दिली होती माहिती
3 ‘काही जोकर्समुळे पसरतोय करोना’; लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर भडकला सलमान
Just Now!
X