News Flash

”माझं शरीर..माझी अब्रू..माझी मर्जी”, ओढणी का घेत नाहीस विचारणाऱ्या युजरला दिव्यांका त्रिपाठीची चपराक

"कृपया तुमची आणि आसपासच्या मुलांची नियत सुधारा."

(photo-instagram@divyankatripathidahiya)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे लाखो चाहते आहेत. मालिकांसह रियॅलिटी शोमधून दिव्यांकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. सोशल मीडियावरही दिव्यांकाचे लाखो चाहते आहेत. मात्र अनेकदा सोशल मीडियावर दिव्यांकाला वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. या ट्रोलर्सना दिव्यांका वेळोवेळी सडेतोड उत्तर देत असते.

नुकतचं एका युजरने दिव्यांकाला ‘क्राईम पेट्रोल’ या शोमधील तिच्या लूकवरून ट्रोल केलंय. मात्र दिव्यांकाने देखील बेधडक उत्तर देत या युजरची बोलती बंद केलीय. “क्राईम पेट्रोल सतर्क: वुमन अगेन्स्ट क्राईम” या विशेष भागात दिव्यांका त्रिपाठी सूत्रसंचालकाची भूमिका बजावतेय. यावरून एका नेटकऱ्याने दिव्यांकाला ट्विटरवर प्रश्न विचारला. “क्राईम पेट्रोल शोच्या एपिसोडमध्ये तुम्ही ओढणी का घेत नाहीस?” असा प्रश्न नेटकऱ्याने केला. यावर दिव्यांकाने सणसणीत उत्तर देत युजरची बोलती बंद केली.

दिव्यांका या युजरला म्हणाली, ” ओढणी न घेतलेल्या मुलींकडे देखील तुमच्या सारख्यांना आदराने पाहण्याची सवय व्हावी यासाठी. महिलांच्या पेहरावाची निंदा करण्याऐवजी कृपया तुमची आणि आसपासच्या मुलांची नियत सुधारा..”माझं शरीर..माझी अब्रू..माझी मर्जी, तुमची सभ्यता…तुमची मर्जी” असं उत्तर देत दिव्यांकाने युजरला चपराक लगावली आहे.

दिव्यांकाच्या या उत्तरानंतर नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. एक युजर दिव्यांकाला म्हणाला, “मॅडम घनश्याम यांचा तर तुम्बी बॅण्ड वाजवला..थेट नियतीवर प्रश्न उभा केला. काय माहित कदाचित ते तुमचे चाहते असतील आणि ओढणीमध्ये तुम्ही त्यांना आवडत असाल.” चाहत्याच्या या प्रश्नावरही दिव्यांका व्यक्त झाली. ” हो शक्य आहे. जर ते फॅन असतील तर त्यांच्या प्रेमासाठी सलाम..मात्र महिलांच्या पेहरावावर प्रश्न निर्माण करणं आता जुनी गोष्ट झालीय. आपण अभिनय, राजकारण, इतिहास, भूगोल कोणत्याही विषयावर चर्चा करू शकतो. त्या तुलनेने ओढणी हा खूप तुच्छ विषय आहे.” असं दिव्यांका म्हणाली.

आणखी वाचा: ‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

आणखई वाचा: विद्यार्थीनीलाच करत होता डेट; ‘अशी’ आहे आर माधवनची प्यार वाली लव्ह स्टोरी

‘ये है मोहब्बते’ या मालिकेतून दिव्यांकाला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. क्राईम पेट्रोलमध्ये ती होस्टच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तर सध्या दिव्य़ांका दक्षिण अफ्रिकेतील केप टाऊनमध्ये खतरों के खिलाड़ी’ च्या ११ व्या पर्वाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 12:21 pm

Web Title: divyanka tripathi slams back who trolled her why she does nor wear dupatta in crime petrol show said may body my my honour kpw 89
Next Stories
1 Video: २० वर्षींनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र; ‘आप के आ जाने से’ गाण्यावर केला डान्स
2 ‘टप्पू’ आणि ‘जेठालाल’मध्ये झाले भांडण? राज अनादकतनी केला खुलासा
3 “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप
Just Now!
X