News Flash

या गोष्टींसाठी दिव्यांकाने मागितली पंतप्रधानांकडे मदत

मुलगाच हवा असा अट्टाहास नाही, पण मुलीला जन्म देण्याची भिती वाटते

दिव्यांका त्रिपाठी

‘ये है मोहब्बते’ फेम दिव्यांका त्रिपाठीला कोणी ओळखत नाही असं होणं अशक्य. हिंदी मालिकांमधून हा चेहरा अगदी करोडोंच्या घरात पोहोचला आणि तो प्रत्येकाच्या घरातलाच झाला. आजही दिव्यांकाने सोशल मीडियावर काही शेअर केले की त्याला शेकडो लाइक्स येतात. टिव्ही जगतातील एक गुणी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

एमा स्टोन ठरली सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री

नुकतेच दिव्यांकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन ट्विट केले. तिच्या या ट्विटचा नक्कीच गांभीर्याने विचार करावा असे आहे. दिव्यांकाने मोदी सरकारला महिला सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. दिव्यांकाने नरेंद्र मोदींना ट्विटरमध्ये टॅग करत सलग तीन प्रश्न विचारले आहेत.
दिव्यांका म्हणते, ‘स्वच्छता मोहिमेअंतर्गत बलात्कार्‍यांना समाजातील कचरा समजून त्यांच्यापासून आमची सुटका करा. आम्ही या नराधमांना घाबरून नाही राहू शकत.’

दुसर्‍या ट्वीट मध्ये दिव्यांका म्हणते की, ‘ महिलांकडे वाईट नजरेने पाहणार्‍या पुरूषांना अशी शिक्षा करा की भविष्यात महिलांकडे वाईट नजरेने पाहण्याची त्यांची हिंमतही झाली नाही पाहिजे. आमचा तुमच्यावर विश्वास आहे.’

तर तिसऱ्या ट्विटमध्ये दिव्यांकाने एक प्रश्नच विचारला आहे. यात ती म्हणते की, ‘आता मुलगी वाचवा म्हणण्यापेक्षा आता मुलीला वाचवा असेच म्हणावे लागत आहे. मुलगाच हवा असा अट्टाहास नाही, पण मुलीला जन्म देण्याची भिती वाटते. ती जन्माला आल्यावर तिला स्वर्गातून नरकात का आणलं याचं उत्तर काय देणार?’

दिव्यांकाच्या तीन ट्विटपैकी कोणत्याही ट्विटला नरेंद्र मोदींनी अजून उत्तर दिलेले नाही. पण तिच्या या ट्विटना तिच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत तिच्या या ट्विटना शेकडो लाइक्स आणि रिट्विट मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 9:43 pm

Web Title: divyanka tripathi tweets to prime minister narendra modi rid us of rapist filth
Next Stories
1 अबब… सनी लिओनीला पाहण्यासाठी एवढी गर्दी!
2 ३२७ मराठी गायकांनी केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
3 एमा स्टोन ठरली सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री
Just Now!
X