News Flash

‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये दिवाळीची धमाल

मालिकेच्या सेटवर नुकतीच दणक्यात दिवाळी साजरी झाली.

घाडगे & सून

दिवाळी म्हटलं चहूबाजूला चैतन्यमय वातावरण असते. दिवाळसणाला सुरुवात होण्यापूर्वी कंदील, पणत्या, घराची रंगरंगोटी – साफसफाई, कपड्यांची जोरात खरेदी सुरु होते. याचबरोबर दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना प्रिय असतो तो म्हणजे फराळ. शंकरपाळी, चकल्या, चिवडा, अनारसे याची तयारी सुरु होते. प्रत्येकाच्याच घरासमोर सुंदर अश्या रांगोळ्या काढल्या जातात. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये देखील दिवाळीची अशीच धमाल सुरु आहे. यंदा तर माईच्या लाडक्या अक्षयचा पहिलाच पाडवा आहे.

Aamir Khan’s Diwali bash PHOTOS : आमिर खानची ग्रॅण्ड दिवाळी पार्टी

माई स्वत: फराळ करण्यास सगळ्यांना मदत करत आहेत, घराला नवीन रंग देण्यात आला आहे. सेटवर भाग्यश्री, शर्मिष्ठा आणि अमृता यांनी मिळून सुंदर रांगोळी काढली. माईंनी सगळ्यांना कामे वाटून दिलेली आहेत. त्यामुळे सेटवर आणि मालिकेमध्ये देवाळीची जय्यत तयारी सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. सेटवर सगळ्यांनीच एकत्र येऊन हा सण साजरा केला.

सेलिब्रिटी रेसिपी: सुयश टिळक सांगतोय कशी करायची ‘कांद्याची करंजी’

‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा हे दिवस साजरे केले जात आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी माईंनी अक्षयला उटणे लावले, घरातील पुरुष मंडळींचे औक्षण केले. अक्षय आणि अमृताचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे सगळ्यांनाच माहिती असून आता दोघांमध्येही मैत्रीच्या नव्या नात्याची सुरुवात झालेली आहे. दिवाळीमध्ये अमृता आणि अक्षय दोघांनी मिळून घराची सजावट केली. घाडग्यांच्या सुनेचा पहिला पाडवा असल्यामुळे तिला साडी, सौभाग्याचं लेणं आणि एक दागिना माईनी भेट म्हणून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 4:13 pm

Web Title: diwali 2017 celebration on colors marathi ghadge suun serial
Next Stories
1 २८० रुपयांवरून ट्विंकल खन्ना दुकानदारावर भडकली
2 Aamir Khan’s Diwali bash PHOTOS : आमिर खानची ग्रॅण्ड दिवाळी पार्टी
3 कमाल आर खान ट्विटरविरोधात कोर्टात जाणार
Just Now!
X