05 March 2021

News Flash

दिवाळीत प्रेक्षकांसाठी खास ‘मनोरंजनाचा महाउत्सव’

दिवाळी प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

दिवाळी हा दिव्यांचा, मांगल्याचा सण. त्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार मंडळीदेखील सज्ज झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना खास चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.

शेमारु मराठीबाणा या वाहिनीवर लवकरच ‘मनोरंजनाचा महाउत्सव’ सादर करण्यात येणार आहे. या महाउत्सवाअंतर्गंत काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या १४, १५ आणि १६ नोव्हेंबर, या तीन दिवसांत तीन चित्रपट लागोपाठ दाखविण्यात येणार आहेत.

येत्या १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर होणार आहे. दुपारी १२ व सायंकाळी ६ वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ व सायंकाळी ६ वाजता रसिकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 3:45 pm

Web Title: diwali special movie show shemaroo marathi manoranjanacha mahautsaha ssj 93
Next Stories
1 …म्हणून ‘हा’ फोटो शेअर करत टायगर श्रॉफने मागितली माफी
2 ‘मुलगा हवा की मुलगी?’; करीनाने दिलं ‘हे’ उत्तर
3 अध्यात्मिक गुरुंनी माझ्यासोबत…,’आश्रम 2’मधील अभिनेत्रीचा खुलासा
Just Now!
X