News Flash

“किती लाजिरवाणं”; वादळात पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने अभिनेत्री दीपिका सिंह ट्रोल

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल

देशात एकीकडे करोनाचं संकट असताना तौतै चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रीतील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. देशाला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असताना दिया और बाती फेम अभिनेत्री दीपिका सिंहने मात्र मुंबईत रस्त्यावर पडलेल्या झाडांसमोर डान्स करत एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. दीपिकाच्या या कृत्यावंर नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

मुंबईत आलेल्या तौते वादळामुळे तुफान वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झालं उन्मळून पडली होती. यातच अभिनेत्री दीपिका सिंहने संधी साधत घरासमोर पडलेल्या एका मोठ्या झाडासमोर फोटोशूट केलं. तसचं एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला. यात दीपिकाने एक मल्टीकरल ड्रेस परिधान केलाय. पडलेल्या झाडांमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ देत फोटोशूट केलंय. या पोस्टला तिने कॅप्शन दिलंय. यात ती म्हणाली, “झाडांमध्ये” असं कॅप्शनमध्ये ती म्हणाली. मात्र या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी दीपिकाला चांगलच ट्रोल केलंय.

व्हिडीओ शेअर दीपिका कॅप्शनमध्ये म्हणाली, “तुम्ही वादळाला शांत नाही करू शकतं त्यामुळे प्रयत्न करणं थांबवा. तुम्ही स्वत:ला शांत ठेवा. निसर्गाशी प्रेम करा आणि त्याच्या मूड सहन करायला शिका. एक दिवस हे वादळ नक्की जाईल.” असं ती कॅप्शनमध्ये म्हणालीय.

एक युजर दीपिकाच्या या पोस्टवर म्हणालाय, “वादळ आहे मूर्ख”तर आणखी एक नेटकरी म्हणालाय, “वादळात लोक मरत आहेत. तुझ्या सारखी लोक मजा करतायत. किती लाजिरवाणं” आणखी एक युजर म्हणालाय, “वादळामुळे झाडं पडली आहेत आणि तू म्हणते झाडांमध्ये. किती क्रिएटिव्ह” असं म्हणत अनेक युजर्सनी दीपिकाच्या फोटो आणि व्हिडीओवर नापसंती दर्शवलीय.

 

deepika-singh-troll
तर दीपिकाने या आलेल्या आपत्तीची फोटोशूटसाठी संधी घेतल्याचं म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केलीय. तर करोनाच्या काळाच पावसात कशाला भिजतेय असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी व्य़क्त केला.

दीया और बाती हम’ या लोकप्रिय मालिके दीपिका मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:51 pm

Web Title: diya aur baati fame actress deepika singh trolled after photoshoot around uprooted tree amid cyclone kpw 89
Next Stories
1 ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन
2 वयाच्या ५०व्या वर्षी ही मॉडेल झाली आई
3 कोरिओग्राफर गीताने केले लग्न? व्हायरल झालेला फोटो पाहून म्हणाली..
Just Now!
X