छोट्या पडद्यावरील एक अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘दीया और बाती हम.’ या मालिकेत आरजू राठीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची तेहलान शुक्रवारी लग्न बंधनात अडकली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
प्राचीने दिल्लीमधील बिझनेसमॅन रोहीत सरोहाशी लग्न केले आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्याला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती. प्राचीने इन्स्टाग्रामवर लग्न सोहळ्यामधील काही फोटो शेअर करत लग्न बंधनात अडकली असल्याचे म्हटले.
प्राचीने शेअर केल्या फोटोमध्ये तिच्या पतीचा चेहरा ब्लर दिसत आहे. तसेच ती देखील नवऱ्याच्या मागे उभी असल्याचे दिसत आहे. ‘७ ऑगस्ट २०२० माझ्या लग्नाची तारीक’ असे तिने फोटो शेअर करत कॅप्शन दिले होते. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यापूर्वी प्राचीने तिच्या मेहेंदी कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने, ‘दिया और बाती हम या मालिकेतून मला ब्रेक देणाऱ्या माझ्या आवडत्या निर्मात्यांनी दिलेली भेट. धन्यवाद’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्राचीने दिया और बाती हम, इक्यावन या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने मल्याळम चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 10:42 am