03 March 2021

News Flash

‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकाराचे झाले जग्गू दादाशी भांडण, व्हिडीओ व्हायरल

“शंकरपाळ्या” म्हणत दोघांचं चाललेलं भांडण होतंय व्हायरल

एखादा विनोदी व्हिडिओ लोक किती डोक्यावर घेतील आपण सांगू शकत नाही. नुकताच दोन लहान मुलांच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत होता. त्यातला एक मुलगा दुसऱ्या मुलाला सतत शंकरपाळ्या म्हणत होता. चला हवा येऊ द्या या शोमधला एक अभिनेता आणि कारभारी लय भारी मधला जग्गू दादा यांच्यातही चांगलंच भांडण लागलंय.

झी मराठीनं नुकताच आपल्या सोशल मिडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अभिनेता अंकुर वाढवे आणि महेश जाधव हे दोघे यात भांडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या दोन लहान मुलांच्या भांडणाच्या व्हिडिओवरून हा व्हिडिओ बनवला आहे. यात अंकुर महेशला धमक्या देतोय पण महेश मात्र शंकरपाळ्या या शब्दाशिवाय काही बोलतच नाही. मूळ व्हिडिओही प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा ठरला होता, आता ह्याही व्हिडिओची मजा प्रेक्षक घेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मूळ व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ भारी असल्याच्या कमेंट्सही प्रेक्षकांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. हा व्हिडिओ प्रेक्षकांना तुफान आवडला आहे. महेश जाधवनेही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

महेश सध्या कारभारी लयभारी या मालिकेत जग्गूदादा ही खलनायकी भूमिका साकारत आहे तर अंकुर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 6:18 pm

Web Title: do not mess with jaggu dada viral video vk98
Next Stories
1 Video: कसला करोना आणि कसलं काय, रिंकूला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी
2 90च्या दशकातील या अभिनेत्रीला ओळखलंत? आजही प्रेक्षकांच्या मनावर गाजवते अधिराज्य
3 घोड्याच्या मालकाने नाकारली सलमानची कोट्यावधी रुपयांची ऑफर
Just Now!
X