ऑस्करला सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखले जाते. या पुरस्काराचा सोहळा देखील त्याच्या प्रतिष्ठेप्रमाणेच अगदी भव्यदिव्य स्वरुपात साजरा केला जातो. अगदी रेड कार्पेटपासून कलाकारांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंपर्यंत सर्व ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.

या पार्श्वभूमीवर आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांना पडणारा एकमेव प्रश्न म्हणजे जर डेकोरेशनवरच ही मंडळी कोट्यवधी रुपयांच्या चुराडा करतात, तर मग ऑस्कर जिंकणाऱ्या कलाकारांना बक्षिस म्हणून किती कोटी रुपयांच मानधन मिळत असेल?

विजेत्यांना किती पैसे मिळतात?

विजेत्यांचा केवळ ऑस्करची ट्रॉफी देऊन गौरव केला जातो. या व्यतिरिक्त त्यांना कुठल्याही प्रकारची रोख रक्कम दिली जात नाही. सन्मानचिन्ह हाच विजेत्यांचा खरा सन्मान आहे. असं मत ऑस्कर सुरु करणाऱ्या अॅकेडमी संस्थेचं आहे. त्यामुळे रोख रक्कम दिली जात नाही. परंतु ऑस्करची ट्रॉफी मात्र अत्यंत महाग असते. ट्रॉफीच्या निर्मितीसाठी जवळपास ६० लाख रुपयांचा खर्च केला जातो. एकंदरीत काय तर विजेत्यांना ६० लाख रुपयांची ट्रॉफी आणि इतर आमंत्रित कलाकारांना मिळाणारे लाखो रुपयांचे गिफ्ट हँपर दिली जातात.