News Flash

Birthday Special: ‘विनोदाच्या बादशहा’चे खरे नाव माहिती आहे का?

जाणून घ्या भाऊ कदम यांच्या नावामागचं गुपित

मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. त्यामधील एक अतिशय लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांच्या मनात घर केले आहे. आज महाराष्ट्राच्या घराघरात भाऊ कदम हे नाव पोहोचले आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आज ३ मार्च रोजी भाऊ कदम यांचा वाढदिवस आहे. सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण भाऊ कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी….

भाऊ कदम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे. मात्र चाहते त्याला प्रेमाने भाऊ कदम असंच म्हणतात. विशेष म्हणजे भालचंद्र कदमवरुन तो थेट भाऊ कदम कसा झाला हे त्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.

“मी लहान असताना आई मला भाऊ म्हणून आवाज द्यायची. तर भाऊ हे नाव तसं पसरत गेलं. अनेकजण माझी ओळख करुन देताना ‘भाऊ आला का बघा?’ असं म्हणायचे. असं करत करत सर्वजण मला भाऊ कदम बोलू लागले. जेव्हा मी व्यावसायिक नाटक करायला लागलो तेव्हा सुद्धा याच नावाने मला सगळेजण आवाज देऊ लागले. ‘भाऊ कदमला घ्या’ असे म्हणत म्हणत सगळेच मला भाऊ कदम म्हणायला लागले. नंतर ‘चला हवा येऊ द्या’ शोच्या सुरुवातीला मला भालचंद्र कदम असे म्हटले जात होते. पण नंतर ते परत भाऊ कदमच झालं आणि ते कायमच भाऊ कदम झाले” असे भाऊ कदम म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 10:38 am

Web Title: do you know bhau kadam real name avb 95
Next Stories
1 आमिर खान आणि आदित्य चोप्राला न्यायालयाची नोटीस; काय आहे प्रकरण?
2 Video : दिवसाची सुरूवात कशी करावी हे सांगत शिल्पाने शेअर केला व्हिडीओ
3 आरोह झाला बाबा, सोशल मीडियावरुन दिली आनंदाची बातमी
Just Now!
X