15 August 2020

News Flash

दीपिकाच्या या गाऊनची किंमत माहिती आहे का? वाचून व्हाल थक्क

दीपिकाने हा गाऊन स्टार स्क्रीन अवॉर्ड्स २०१९मध्ये परिधान केला होता

बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंग आणि मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्याचे बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात. तसेच ही बाजीराव- मस्तानीची जोडी त्यांच्या फॅशनेबल आऊटफिटसाठी देखील लोकप्रिय आहे. पण बऱ्याच वेळा रणवीर आणि दीपिकाचे आऊटफिट चाहत्यांच्या पसंतीला उतरत नसल्याचे पाहायला मिळते. मात्र या वेळी दीप-वीर एकदम साध्या पण ग्लॅमरस अंदाजात एका अवॉर्ड शोला पोहोचले आहेत. त्यांचा हा लूक चाहत्यांना आवडला असल्याचे दिसत आहे.

नुकताच स्टार स्क्रीन अवॉर्ड्स २०१९ हा सोहळा पार पडला. या अवॉर्ड फंक्शनला दीपिका आणि रणवीरने हजेरी लावली. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणवीरने काळ्या रंगाचा सूट आणि बूट घातला होता. तर दीपिकाने रणवीरला मॅचिंग काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यावर तिने स्मोकी आय आणि न्यूड लिप्स मेकअप केला होता. या लूकमध्ये दीपिका अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

बॉलिवूडच्या मस्तानीच्या या गाऊनची किंमत तुम्हाला माहित आहे का? या काळ्या रंगाच्या वन शोल्डर गाऊनची किंमत तब्बल २,२५० डॉलर म्हणजे जवळपास १ लाख ६० हजार रुपये आहे. हा गाऊन अ‍ॅलेक्स पेरीने (Alex Perry) डिझाइन केला असल्याचे म्हटले जात आहे.

दीपिका लवकरच मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ चित्रपटात दिसणार आहे. ती या चित्रपटात अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 1:05 pm

Web Title: do you know deepika padukones black gown cost avb 95
Next Stories
1 “हा तर मोहम्मद अली जिना यांचा पुनर्जन्म, हॅलो हिंदू पाकिस्तान”, स्वरा भास्करचा मोदी सरकारवर निशाणा
2 शाहरुखचे चित्रपट पाहून अभिनय शिकणारा झाला देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता
3 “मी तुमच्यासाठी परत येतेय”! दशकभरानंतर सुष्मिताचं कमबॅक
Just Now!
X