News Flash

न्यू इअर पार्टीमध्ये सुहानाचा ग्लॅमरस अंदाज, ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शाहरुखने पार्टीचे आयोजन केले होते

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर फारशी सक्रिय असल्याचे पाहायला मिळत नाही. मात्र तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या शिवाय रहात नाहीत. नुकताच सुहाना संपूर्ण कुटुंबीयांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेहून भारतात परतली. दरम्यान शाहरुखने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सुहानाने परिधान केलेल्या ड्रेसने.

शाहरुखने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सुहानाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. तिने परिधान केलेल्या या ड्रेसमुळे ती सध्या चर्चेत आहे. या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. सुहानाने परिधान केलेल्या Balmain ड्रेसची किंमत दोन लाख रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

2020..

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

शाहरुखने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आमंत्रण देण्यात आले होते. सुहानाची खास मैत्रीण अनन्या पांडे आणि संजय कपूर तेथे उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर पार्टीमधील फोटो शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 2:58 pm

Web Title: do you know suhana khan dress price which was wore in new year party avb 95
Next Stories
1 शोलेमध्ये जय-वीरुसोबत धार्मिक भेदभाव? जावेद जाफरी भडकला
2 घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अनन्या पांडेला ‘गल्ली बॉय’ फेम सिद्धांत चतुर्वेदीचं जबराट उत्तर
3 बापरे! अभिनेत्याने दिली चक्क १ लाख ४० हजारांची टिप
Just Now!
X