16 January 2019

News Flash

प्रियांकाच्या हँडबॅगची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल !

अभिनेत्रींना असलेल्या ब्रँडेड कपड्यांचे, वस्तूंचे शौक अनेकांना नवीन नाहीत. यासाठी वाट्टेल तितका पैसा खर्च करण्यात सेलिब्रिटी मागेपुढे पाहत नाही.

सध्या प्रियांकाच्या हँडबॅगची चर्चा सर्वाधिक होत आहे आणि यामागचं कारण आहे या बॅगची किंमत.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडच काय पण जगभरातील सर्वात मोस्ट स्टाईलिश अभिनेत्रींपैकी एक म्हणून गणली जाते. प्रियांकाच्या फॅशन सेन्सची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते मग मेट गालासाठी तिने निवडलेला गाऊन असो किंवा मेगन मार्कलच्या लग्नासाठी परिधान केलेला मॉर्निंग ड्रेस असो. तर सध्या प्रियांकाच्या हँडबॅगची चर्चा सर्वाधिक होत आहे आणि यामागचं कारण आहे ते या बॅगची किंमत.

अबब! ‘भारत’ चित्रपटासाठी प्रियांकानं आकारलंय चक्क एवढ्या कोटींचं मानधन?

अभिनेत्रींना असलेल्या ब्रँडेड कपड्यांचे, वस्तूंचे शौक अनेकांना नवीन नाहीत. यासाठी वाट्टेल तितका पैसा खर्च करण्यात सेलिब्रिटी मागेपुढे पाहत नाही. हे क्षेत्रच ‘शोबिझ’चं आहे त्यामुळे जिथे लक्झरीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला नाही तर चर्चा होणार नाही हा फंडा अनेकांना कळला आहे. नुकतीच प्रियांका तिचा तथाकथित बॉयफ्रेंड निक जोनाससोबत डिनर डेटला जाताना दिसली. यावेळी प्रियांकाच्या हातात असलेल्या छोट्याशा बॅगनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.

‘या’ सेकंड हँड बॅगची किंमत ऐकून तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल

प्रियांकानं फिक्कट मिडनाइट ब्लू ड्रेसवर कॅरी  केलेली ही हँडबॅग Bottega Veneta या लक्झरी ब्रँडची होती. या बॅगची भारतीय मुल्याप्रमाणे  किंमत ही साधरण ४ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे एखाद्या छोट्या बॅगची एवढी मोठी किंमत ऐकून एखाद्याच्या भुवया उंचावल्या तर नवल वाटायला नको.

First Published on June 14, 2018 1:21 pm

Web Title: do you know the cost of priyanka chopra bottega veneta hand bag