बॉलिवूड सेलिब्रिटींची लाइफस्टाइल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. महागड्या ब्रॅण्डचे कपडे घालणाऱ्या या सेलिब्रिटींच्या अंगावर तो ड्रेस पुन्हा कधीच दिसत नाही. त्यांच्या कपड्यांची कॉपी करण्याची इच्छा अनेक सामान्य व्यक्तींना असते. पण म्हणतात ना, शौक बहुत बडी चीज है….. अहो, या सेलिब्रिटींच्या कपड्यांच्या किंमतीच ऐकून हैराण व्हायला होते. मग त्यांच्याप्रमाणे स्टाइल करणं तर दूरच राहिले. त्यांच्या ब्रॅण्डेड कपड्याच्या किंमतीत एखादी सामान्य व्यक्ती त्यांची अनेक स्वप्न पूर्ण करू शकते.

वाचा : ‘आम्ही सोबत असल्यावर आम्हाला इतर कोणाची गरज नाही’

सैफ अली खानची बेगम करिना कपूर खान ही नेहमीच तिच्या स्टाइल स्टेटमेण्टसाठी ओळखली जाते. तिने वर्कआउटसाठी घातलेल्या कपड्यांपासून ते एखाद्या कार्यक्रमातील तिच्या डिझायनर ड्रेसपर्यंत सगळ्याचीच चर्चा होते. नुकतीच ती एका पार्टीला गेली होती. यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या शर्टवर गुलाबी स्कार्फ घेतला होता. तसं बघायला गेलं तर हा शर्ट अगदी साधा वाटत होता. पण बेबोने तो घातला आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना…. करिनाने घातलेल्या गुची ब्रॅण्डच्या या शर्टची किंमत तब्बल ५७ हजार रुपये आहे. हा सिल्क शर्ट ‘मेड इन इटली’ आहे.

PHOTO : अभिनेते जयवंत वाडकर यांची ‘ग्लॅमरस’ कन्या

सध्या करिना आगामी ‘वीरे दी वेडिंग’साठी चित्रीकरण करतेय. पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात तिच्यासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.