News Flash

Video : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री

या व्हिडिओच्या माध्यमातून रणवीरने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीविषयी सांगितलं आहे.

रणवीर सिंग

बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंग हा अनेकांचा आवडता कलाकार असेलच. त्याच्या अभिनयाचे, लूकचे, अतरंगी फॅशनचे आणि स्वभावाचे लाखो चाहते आहेत. पण रणवीरला कोणती अभिनेत्री आवडते हे तुम्हाला माहित आहे का? रणवीरच्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये सर्वांत आधी दीपिकाचं नाव घेतलं जाईल. पण हे त्याचं उत्तर नाही. रणवीर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा चाहता आहे आणि हे त्याने स्वत: सांगितलं आहे.

रणवीर सिंगची आवडती अभिनेत्री आहे अमृता खानविलकर. अमृताने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रणवीर तिच्याबद्दल बोलत आहे. ‘मनोरंजन विश्वातली माझी सर्वांत आवडती अभिनेत्री आहे अमृता खानविलकर. ती अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान आहे,’ असं तो या व्हिडिओत म्हणत आहे. आता रणवीरने अमृतासाठी अचानक हा व्हिडिओ शूट का केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यामागचं कारण म्हणजे अमृता ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याने रणवीरने तिला या व्हिडिओमार्फत शुभेच्छा दिल्या आहेत.

#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा

अमृता आणि रणवीर यांच्या खूप चांगली मैत्री आहे. रणवीरच्या अभिनयाची अमृतासुद्धा चाहती आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये अमृताने याचा उल्लेख केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 3:18 pm

Web Title: do you know who is ranveer singh favorite marathi actress watch this video
Next Stories
1 #MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा
2 #MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा
3 राजघराण्यात पाळणा हलणार, मेगन होणार आई
Just Now!
X