X
X

हृतिकसोबतच्या या मुलाला ओळखलंत का?; आता आहे तरुणाईच्या गळ्यातील ताईत

READ IN APP

चित्रपटसृष्टीतील त्याचा प्रवास पाहून अनेकांनाच हेवा वाटतो.

आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याचा आनंद कोणाला होत नाही? किंबहुना ही प्रत्येकाची इच्छा असते की एकदातरी रुपेरी पडद्यावर दिसणारा आपल्या आवडीचा तो चेहरा आपल्या शेजारी उभा असावा, त्याच्या किंवा तिच्यासोबत आपला एकतरी फोटो असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशीच इच्छा त्या लहान मुलाचीही होती. मुख्य म्हणजे त्याची ती इच्छा पूर्णही झाली. तोच मुलगा आज या चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. हृतिकसोबत या फोटोमध्ये दिसणाऱ्या या लहान मुलाचं नाव आहे विकी कौशल.

विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनही दिसत आहे. ‘ड्रॉव्हर साफ करताना मला हा फोटो सापडला. मी हृतिकच्या ‘फिजा’ चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. त्यावेळी ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता आणि मीसुद्धा त्याच्या असंख्य चाहत्यांपैकीच एक होतो. त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की, हृतिक त्यांनाच भेटतो ज्यांना ‘इक पल का जीना’ या गाण्यावर नाचता येतं. मीसुद्धा त्या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तीन दिवस या गाण्यावर नाचण्याची प्रॅक्टीस केली होती. पण, ज्यावेळी मी हृतिकला भेटलो, तेव्हाचा तो क्षण मी शब्दातही मांडू शकत नाही. तो नेहमीच प्रेरणा देत राहील…’, असं भलंमोठं कॅप्शन विकीने या फोटोला दिलं आहे.

त्याच्या या कॅप्शनमधून एक अभिनेता म्हणून नव्हे तर, एक सर्वसामान्य चाहता म्हणून त्याने भावना व्यक्त केल्या. विकी सध्याच्या घडीला चांगलाच नावाजला जात आहे. ‘मसान’ या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. नुकतंच त्याला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

21

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on: September 19, 2019 6:10 pm
Just Now!
X