28 February 2021

News Flash

देवाच्या प्रेमासाठी डॉलीबाईंनी स्वीकारलं नवं आव्हान

डॉक्टर डॉन मालिकेत नवे वळण

अभिनेता देवदत्त नागे, अभिनेत्री श्वेता शिंदे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या कलाकारांची ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या. मालिकेत आता डॉलीबाईंनी देवाच्या प्रेमासाठी एक नवीन आव्हान स्वीकारले आहे.

सध्या मालिकेत देवा राधा आणि कबीरच्या प्रेमासाठी डॉलीबाईंपासून दूर जातोय. पण डॉलीबाईंचा आपल्या प्रेमावर विश्वास आहे आणि आपलं प्रेम मिळवण्यासाठी त्या प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत.

डॉलीबाईंनी देवाच्या प्रेमासाठी एक नवीन आव्हान स्वीकारले आहे. अक्काचा देवा आणि मोनिका यांच्या प्रेमाला विरोध असताना देवाचा सहवास मिळावा म्हणून डॉलीबाई मोलकरीण बनून देवाच्या घरी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी डॉलीबाईंनी स्वतःची वेशभूषा देखील बदलली आहे. आता डॉलीबाईंची ही नवी ओळख त्यांना देवाच्या जवळ नेईल का? ही मोलकरीण म्हणजे डॉलीच आहे हे अक्काच्या लक्षात येईल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 11:30 am

Web Title: doctor don serial dolly bai avb 95
Next Stories
1 Video : माय-लेकाची सुपर जोडी! सलमानने आईसोबत धरला ‘या’ गाण्यावर ताल
2 ‘माझा होशील ना’मध्ये सई-आदित्यची रोमॅण्टिक केमिस्ट्री
3 ‘…तर थोबाड फोडेन’; कश्मिराने दिली निक्कीला धमकी
Just Now!
X