News Flash

अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली?

डॉक्टर डॉन मालिकेत नवे वळण

लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. देवा भाईची हटके स्टाईल, त्याची भन्नाट गॅंग, डॉलीबाई, त्यांची जुगलबंदी आणि मुलीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये देवा भाईने केलेला दंगा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. आता या मालिकेत एक नवे वळण येणार आहे.

या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील देवा आणि डॉक्टर मोनिका ही पात्रं प्रेक्षकांच्या मनात घरकरून बसली आहेत. सोशल मीडियाद्वारे देखील या कलाकारांवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. सध्या मालिकेतील देवा आणि डॉ मोनिका यांचा लव्हट्रॅक प्रेक्षकांना आवडत आहे. आता दोन व्यक्तिंमधलं प्रेम म्हंटलं की त्यात उतार चढाव आलेच, रुसवे फुगवेही आले शिवाय आपल्याच लोकांची नाराजी किंवा त्यांचे हेवेदावेही आलेच. डॉक्टर डॉनमध्ये सध्या याच प्रेमाची परिक्षा पाहिली जातेय.

देवाच्या प्रेमाला अक्काचा साफ विरोध आहे हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. पण अक्का आता देवाच्या आयुष्यात अजून एक डॉली घेऊन येणार आहे आणि हि डॉली दुसरी तिसरी कोणी नसून एक म्हैस आहे जी अक्का डॉलीच्या घरासमोर बांधते. आता डॉलीबाई या नवीन डॉलीला बघून काय प्रतिक्रिया देणार आणि देवा या नवीन डॉलीचा स्वीकार करणार का? अक्का आणि मोनिकाच्या भांडणांमध्ये देवाची काय अवस्था होणार? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 3:26 pm

Web Title: doctor don serial new twist avb 95
Next Stories
1 आर माधवनच्या चित्रपटात शाहरुख साकारणार भूमिका?
2 ‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध
3 KBC 12: १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
Just Now!
X