News Flash

देवा आणि डॉ मोनिकाच्या प्रेमामध्ये सुरु झाली अडथळ्याची शर्यत

डॉक्टर डॉन मालिका एका वेगळ्या वळणावर

‘डॉक्टर डॉन’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरत आहे. तसेच सध्या देवा आणि डॉ मोनिका यांचा लव्ह ट्रॅक देखील प्रेक्षकांच्या चांगला पसंतीला उतर आहे. आता प्रेम म्हंटलं की ते सहज सोप्प थोडीच असणार त्यातही उतार चढाव आले, रुसवे फुगवे आले जवळच्या लोकांच्या नाराजी किंवा त्यांचे हेवेदावेही आलेच. अशा या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून पुढे जात रहतं ते खरं प्रेम. ‘डॉक्टर डॉन’मध्ये सध्या याच प्रेमाची परिक्षा पाहिली जातेय. देवा डॉ मोनिकाला लग्नाची मागणी घालण्याच्या तयारीमध्ये असतानाच त्याच्याच घरची माणसं त्याची ही परिक्षा घेऊ पहातायत.

एकीकडे देवाच्या आक्केचा डॉ मोनिकाला साफ विरोध आहे तर दुसरीकडे देवाची मुलगी राधा त्याच्या या प्रेमात आडकाठी घालू पहातेय. तिने तर देवाला सक्त ताकीद दिलीये की एक महिन्याच्या आत त्याने डॉ मोनिकासमोर त्याचं खरं रुप दाखवावं नाहीतर ती स्वतः तिच्या मोनिका मॅमना आपल्या वडिलांचं म्हणजे देवाचं सत्य सांगेल. देवा या सगळ्यामुळे चांगलाच कात्रीत सापडलाय. या सगळ्यामध्ये डॉ मोनिका त्याच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. इतकंच नाही तर तिने देवाला खात्री दिलीये की ती आक्काचा नकार होकारामध्ये बदलून दाखवेन एवढंच नाही तर कबीर हा तिचा मुलगा असल्याची कबूलीही तिने देवाला दिलीये.

देवा मात्र अजूनही तिच्यासमोर त्याचं खरं रुप उलगडू देत नाहीये त्याला भीती वाटतेय की देवा डॉन आहे जर डॉ मोनिकाना कळलं तर ती त्यांना सोडून कायमची निघून जाईल तर दुसरीकडे ज्या पोटच्या मुलीसाठी देवाने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केलेला ती राधाच आता त्याच्या प्रेमाच्या विरोधात उभी असल्याने तिला कसं समजवावं याचा प्रश्न त्याला पडलाय. देवा, डॉ मोनिका, कबीर आणि राधा हे नव्यानं बनू पहाणारं कुटुंब पुढे काय रुप घेणार हे पहाणं अर्थातच उत्सुकतेचं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 3:01 pm

Web Title: doctor don serial on different mode avb 95
Next Stories
1 सुष्मिताच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, करणार ‘या’ चित्रपटामध्ये काम
2 कौतुकास्पद! सोनू सूदने ऑनलाइन अभ्यासातील अडचण दूर करण्यासाठी गावात बसवला मोबाईल टॉवर
3 Video : ड्रग्स प्रकरणावर अक्षय कुमारने सोडलं मौन; हात जोडून म्हणाला…
Just Now!
X