25 February 2021

News Flash

‘डॉक्टर डॉन’ची करोना योद्धयांना मदत!

मालिकेचा सेट करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे

लॉकडाउनमुळे सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण अनलॉक प्रक्रिया सुरु होताच सरकारने मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली. त्यासाठी काही नियम आखण्यात आले. आता सर्व मालिकांचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे ‘झी युवा’वरील ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका एका आगळ्यावेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. पडद्यावरील डॉक्टर डॉन आता खऱ्या आयुष्यात करोना योद्ध्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.

डॉक्टर डॉन या मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेटमध्ये, हॉस्पिटलच्या सेटचा समावेश आहे. मालिकेत पाहायला मिळत असलेले हे हॉस्पिटल, यापुढे कोविड सेंटर म्हणून वापरले जाणार आहे. मीरा-भाईंदर परिसरात ‘डॉक्टरडॉन’ या मालिकेतील हॉस्पिटलचे चित्रीकरण करण्यात येत होते. या महापालिकेला, कोविड सेंटरसाठी जागेची आवश्यकता होती. हॉस्पिटलचा सेट उभारलेला असल्याने, ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आली. संपूर्ण देश कोविड-१९च्या महामारीशी लढत असताना, मालिकेच्या टीमने सुद्धा कोविड योद्ध्यांना मदत करण्याची ही संधी सोडली नाही.

करोना विरुद्धच्या लढाईत आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी मालिकेचा सेट, महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. मालिकेत गोंधळ, धमाल आणि मजामस्तीचा केंद्रबिंदू ठरणारा हा सेट, यापुढे करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. चित्रीकरणासाठी नवा पर्याय शोधणे, ही छोटीशी समस्या समोर उभी होती, तरीही मालिकेच्या सेटचा वापर एका अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी होणार असल्याने, टीममधील प्रत्येक कलाकार खूप खुश आहे. नेहमी त्याच्या धुंदीत असणारा, राडे करणारा डॉक्टर डॉन, आता थेट कोविड योद्धयांच्या मदतीला धावून आलेला आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण कर्जत येथे एका रिसॉर्ट मध्ये होतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 5:40 pm

Web Title: doctor don serial set converted into covid 19 center avb 95
Next Stories
1 टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल
2 ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याला झाला करोना
3 “काँग्रेसचा हात भाजपाच्या हातात”; राजस्थानमधील घडामोडींवर अभिनेत्याची टीका
Just Now!
X